AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari : गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारी स्वनिधी योजना, नितीन गडकरींच्या हस्ते स्वनिधी महोत्सवाचे थाटात उद्घाटन

स्वनिधी महोत्सवांतर्गत भजन, गायन, नृत्य, मिमिक्री, नाट्य, वादन, कुकिंग आदी ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन पथविक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांसाठी करण्यात आले होते. यासाठी मनपाद्वारे व्हिडिओ स्वरूपात सादरीकरण मागविण्यात आले होते.

Nitin Gadkari : गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारी स्वनिधी योजना, नितीन गडकरींच्या हस्ते स्वनिधी महोत्सवाचे थाटात उद्घाटन
नितीन गडकरींच्या हस्ते स्वनिधी महोत्सवाचे थाटात उद्घाटन
| Updated on: Jul 30, 2022 | 2:22 PM
Share

नागपूर : पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून पथविक्रेत्यांच्या स्वावलंबनासाठी महत्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. पथविक्रेत्यांच्या स्वावलंबनासाठी लागू करण्यात आलेली ही योजना गोरगरीब पथविक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारी आहे. असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत स्वनिधी महोत्सवाचे नागपूर महापालिकेद्वारे यशस्वी आयोजन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महापालिकेद्वारे समाज विकास विभागाच्या (Social Development Department) दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत पथविक्रेत्यांच्या (Street Vendor) स्वावलंबनाच्या उद्देशाने हा महोत्सव घेण्यात आला. शुक्रवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये (Suresh Bhat Auditorium) स्वनिधी महोत्सवाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर आमदार कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी., नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक डॉ. किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

20 हजार लोकांना कर्ज उपलब्ध

नितीन गडकरी म्हणाले, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून जवळपास 20 हजार लोकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांचे मोठे योगदान आहे. गरिबांना कर्ज मिळण्यास अनेक अडचणी येतात. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदयची संकल्पना मांडली. गरिबाला परमेश्वर मानून शेवटापर्यंत सेवा करायची. त्यांच्या या विचारातून प्रेरणा घेऊन महत्वाचे कार्य नागपूर महापालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे केले जात आहे, ही आनंददायी बाब आहे, असे सांगत त्यांनी मनपाचे अभिनंदन केले. पथविक्रेत्यांनी विश्वसनीयता जपत कर्जाची वेळेवर परतफेड करून पुढे आणखी कर्ज घेऊन आपला व्यवसाय वाढीस न्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

विविध ऑनलाईन स्पर्धा

प्रास्ताविकमध्ये मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांनी योजनेबददल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, स्वानिधी योजना सक्षमपणे राबविण्यासाठी नागपूरचा समावेश देशाच्या पहिल्या पाच शहरामध्ये करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ मोठ्या संख्येने पथ विक्रेते यांना मिळाला आहे. पथ विक्रेत्यांच्या कुटुंबाकरिता व स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्यांकरिता विविध ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्वनिधी महोत्सवांतर्गत भजन, गायन, नृत्य, मिमिक्री, नाट्य, वादन, कुकिंग आदी ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन पथविक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांसाठी करण्यात आले होते. यासाठी मनपाद्वारे व्हिडिओ स्वरूपात सादरीकरण मागविण्यात आले होते. यापैकी उत्कृष्ट गायन, नाट्य, वादनचे कार्यक्रमात सादरीकरण करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नृत्य, गायन आणि कुकिंग स्पर्धेतील पहिल्या दोन विजेत्यांना प्रथम पुरस्कार 3 हजार रुपये आणि द्वितीय पुरस्कार 2 हजार रुपये प्रदान करण्यात आले. याशिवाय पथविक्रेत्यांच्या गुणवंत मुलांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 95 टक्क्यांच्या वर गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही रोख पुरस्काराने गौरविण्यात आले. स्वनिधी महोत्सव आणि पथविक्रेत्यांच्या विविध योजनांबाबत तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले होते. शहरी उपजीविका केंद्राअंतर्गत बचत गटाच्या सदस्यांनी स्वागत गीत सादर केले. पथविक्रेत्यांकडून यावेळी सादर करण्यात आलेल्या गोंडी नृत्याला उपस्थितांनी दाद दिली.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.