विधान परिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना कुणाचे आव्हान?, काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराची घोषणा नाही, तगडा उमेदवार देणार – ठाकरे

काँग्रेसनं उमेदवार ठरविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काल एक बैठक घेतली. यात काही नावं हायकमांडकडे पाठविण्यात आलेत. भाजपला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसही ओबीसी उमेदवारी देणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार आणि नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिलीय.

विधान परिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना कुणाचे आव्हान?, काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराची घोषणा नाही, तगडा उमेदवार देणार - ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 1:08 PM

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपनं ओबीसी कार्ड खेळत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिलीय. या माध्यमातून भाजपनं काँग्रेसपुढं तगडं आव्हान उभं केलंय. दुसरीकडे काँग्रेसचा अद्याप उमेदवार ठरलेला नाही.

काँग्रेसनं उमेदवार ठरविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काल एक बैठक घेतली. यात काही नावं हायकमांडकडे पाठविण्यात आलेत. भाजपला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसही ओबीसी उमेदवारी देणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार आणि नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिलीय.

जोमाने काम करणार : बावनकुळे

गेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे नाराज असल्याचं बोलल जात होतं. पण, त्यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावली. पक्षाच्या प्रचारासाठी इमाने इतबारे काम केलं. आता पक्षानं त्यांना पुन्हा संधी दिली आहे. आता पुन्हा विधिमंडळात जोमानं काम करणार असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.

कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांसाठी संघर्ष

चंद्रशेखर बावनकुळे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. 1990 पासून त्यांनी कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आंदोलनं करून जेलमध्येही गेले. छत्रपती सेना या संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक कामे केलीत. 1995 मध्ये नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजयुमोचे उपाध्यक्ष, जिल्हा महामंत्री अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या.

भाजपने दिली होती जि.प.ची उमेदवारी

1997 मध्ये कोराडी जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपकडून उमेदवारी मिळाली. त्यावेळी ते निवडून आले. 2002 मध्ये जिल्हा परिषदेत दुसऱ्यांना निवडून आल्यानंतर ते झेडपीत विरोधी पक्षनेते झाले. 2004 मध्ये कामठी विधानसभा क्षेत्रातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली. त्यात त्यांनी विजय संपादन केला. त्यानंतर पुन्हा दोनदा ते आमदार झाले. मंत्रीपद मिळाल्यानंतर नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.

कोराडीच्या जगदंबा संस्थानचे अध्यक्ष

2010-11 नागपूर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले. श्री क्षेत्र महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळंच कोराडी देवस्थानचा विकास झालाय. कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रात त्यांनी बरीच विकासकामे खेचून आणली. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानं त्यांनी आता पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

‘पक्षाने विश्वास टाकला, सर्वांचे आभार, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार’, चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया

वाघानं घेतला महिला वनरक्षकाचा बळी, ताडोबातील कोअर झोनमधील घटना

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.