शेतकऱ्यांना गांजा पिकवण्याचीही परवानगी देऊन टाका; नव्या वाईन पॉलिसीवर चिखलीकरांचा संताप

राजीव गिरी

राजीव गिरी | Edited By: अजय देशपांडे

Updated on: Jan 30, 2022 | 5:02 PM

राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये नव्या वाईन विक्री धोरणाला परवानगी दिली आहे. नव्या वाईन पॉलिसीनुसार आता किराणा दुकान आणि शॉपिंग मॉलमध्ये वाईन विक्रीसाठी ठेवता येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर राज्यभरातून टीका होत आहे. आता या वादात नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील उडी घेतली आहे.

शेतकऱ्यांना गांजा पिकवण्याचीही परवानगी देऊन टाका; नव्या वाईन पॉलिसीवर चिखलीकरांचा संताप
प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड : राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये नव्या वाईन विक्री धोरणाला परवानगी दिली आहे. नव्या वाईन पॉलिसीनुसार (new wine policy) आता किराणा दुकान आणि शॉपिंग मॉलमध्ये वाईन विक्रीसाठी ठेवता येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर राज्यभरातून टीका होत आहे. आता या वादात नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (MP Pratap Patil Chikhlikar) यांनी देखील उडी घेतली आहे. राज्य सरकारच्या (State Government) या निर्णयाचा निषेध करत त्यांनी जोरदार टीका केली आहे. नवी वाईन पॉलिसी ही शेतकऱ्यांच्या फायद्याची असल्याचे सरकार सांगत आहे. वाईनच्या माध्यमातून महसूल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवविण्यापेक्षा थेट शेतकऱ्यांनाचा  गांजा विक्रीची परवानगी द्यावी असा टोला प्रताप पाटील चिखलीकर यांनी लागावला आहे. देगलूर तालुक्यातील येरगी गावात आज पंतप्रधानांचा मन की बात कार्यक्रम ऐकण्याचा सामूहिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर चिखलीकर यांनी पत्रकारांशी स्ंवाद साधला.

काय म्हणाले चिखलीकर?

यावेळी बोलताना प्रताप पाटील चिखलीकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नव्या वाईन पॉलिसीनुसार राज्य सरकारने किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाई विक्रीस परवानगी दिली आहे. हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तसेच महसूल वाढीसाठी राज्य सरकारने आता शेतकऱ्यांना गांजाचे पिक घेण्याची देखील परवानगी द्यावी. गांजा पिकवण्याची परवानगी मिळाल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल, सोबतच  महसूल देखील वाढेल असा टोला चिखलीकर यांनी लगावला आहे.

‘सरकारला केवळ मद्यविक्रितीच रस ‘

दरम्यान दुसरीकडे शासनाच्या नव्या वाईन पॉलिसीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील जोरदार टीका केली आहे.  त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत, मात्र सरकारला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नसून, त्यांना केवळ मद्यविक्रीत रस असल्याची टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. राज्यात इतरही अनेक विषय आहेत समस्या आहेत मात्र तरी देखील सरकार किराणा दुकांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देत असल्याचा टोला यावेळी राणा यांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या

निवडणूक लढवायला बायको पाहिजे बॅनरचा वाद चिघळला, भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक

देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही गांधी विचाराने चालेल, कोल्हेंबाबत पटोलेंची भूमिका काय?

राज्यात अनेक समस्या मात्र सरकारला केवळ मद्यविक्रीतच रस; वाईन पॉलिसीवरून नवनीत राणा यांचा टोला

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI