VIDEO | वाळू तपासणी पथकातील महिला तलाठ्यावर भाजप नगरसेवकाचा हल्ला

भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्यासह विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nandurbar Corporator attacked lady Talathi)

VIDEO | वाळू तपासणी पथकातील महिला तलाठ्यावर भाजप नगरसेवकाचा हल्ला
महिला तलाठ्यावरील व्हिडीओचा स्क्रीनशॉट

नंदुरबार : तहसीलदार नियुक्त वाळू तपासणी पथकावर भाजप नगरसेवकाने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबारमध्ये उघडकीस आला आहे. पथकातील महिला तलाठ्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Nandurbar BJP Corporator Gaurav Chaudhari allegedly attacked lady Talathi)

भाजप नगरसेवकावर गुन्हा

नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्यासह विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नगरसेवकाच्या हल्ल्यामुळे पथकातील महिला तलाठी कर्मचारी प्रचंड तणावात असल्याची माहिती आहे.

महिलेने कानशिलात लगावल्याचा गौरव चौधरींचा दावा

नगरसेवक गौरव चौधरी यांच्या गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. महिला तलाठ्याने आपल्या कानशिलात लगावल्याचा आरोप नगरसेवक गौरव चौधरी करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर आपल्या अंगावर धावून आल्यामुळे कानाखाली मारल्याचा दावा महिलेने केला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

घराला कुलूप पाहून चोरट्यांनी संधी साधली, तब्बल 65 तोळे सोने आणि 42 हजार रोख रकमेवर डल्ला

वृद्ध महिलेची सून आणि नातवाकडून हत्या, नैसर्गिक मृत्यू भासवण्याचा प्रयत्न फसला

(Nandurbar BJP Corporator Gaurav Chaudhari allegedly attacked lady Talathi)