AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी गँगस्टर होतो, तर मग मुख्यमंत्री कसे केले?, नारायण राणेंचा सेनेला सवाल

सामनाच्या अग्रलेखातून राणेंवर आगपाखड करत राणे एखाद्या छपरी गँगस्टारसारखेच वागत-बोलत असल्याची टीका करण्यात आली होती. त्यालाच आता राणेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मी जर गँगस्टर होतो, तर शिवसेनेनं मला मंत्री का केलं?, मग शिवसेनेच मंत्री हे गँगस्टर आहेत काय?, असा सवालही राणेंनी विचारलाय.

मी गँगस्टर होतो, तर मग मुख्यमंत्री कसे केले?, नारायण राणेंचा सेनेला सवाल
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 5:38 PM
Share

मुंबईः राज्याचं राजकारण केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेंमुळे ढवळून निघालंय. नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील विधानानंतर त्यांची अटक होऊन सुटकाही झाली. आज नारायण राणेंनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. मी गँगस्टर होतो, तर मग मुख्यमंत्री कसे केले?, शिवसेनेत सगळेच मंत्री गँगस्टर आहेत का?, असा थेट सवाल नारायण राणेंनी शिवसेनेला विचारलाय.

मग शिवसेनेचे मंत्री हे गँगस्टर आहेत काय?

सामनाच्या अग्रलेखातून राणेंवर आगपाखड करत राणे एखाद्या छपरी गँगस्टारसारखेच वागत-बोलत असल्याची टीका करण्यात आली होती. त्यालाच आता राणेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मी जर गँगस्टर होतो, तर शिवसेनेनं मला मंत्री का केलं?, मग शिवसेनेच मंत्री हे गँगस्टर आहेत काय?, असा सवालही राणेंनी विचारलाय.

मला कोणी काही करु शकत नाही, तुमच्या कुठल्याच प्रक्रियेला घाबरत नाही

चिपळूणला झेंडो दाखवले. मी म्हटलं ठीक आहे भगवे झेंडे आहेत. शिवसैनिकांची प्रचंड गर्दी? 17 माणसं होती. मी मुद्दाम मोजली. त्यापुढे आम्ही गेलो. तिथे एका कोपऱ्यामध्ये आवाज बाहेर येत नव्हते तरी काढत होते. 13 माणसं. आमच्या घरावर किती आले ते मी मोजले नाहीत. पण पराक्रमी लोकांचे व्हिडीओ क्लीप मिळतील. आम्ही तिघंही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे कारायचं ते केलं. तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत? एवढंच आठवणीत ठेवा. तुम्ही कोणी मला काही करु शकत नाही. तुमच्या कुठल्याच प्रक्रियेला मी घाबरत नाही. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. त्यावेळी आताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारेही नव्हते. कुठे होते तेही माहिती नाही. म्हणून त्यांना आंदोलन करायचं ते करु दे. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था पाहत राहावं, असा सल्ला राणे यांनी पोलिसांना दिला.

मोदींनी जनतेचे आशीर्वाद मागण्यास सांगितलं, परवापासून पुन्हा यात्रा सुरु होईल

तसेच, गेले काही दिवस माझा जनआशीर्वाद यात्रा चालू असताना जे काही प्रसारमाध्यमात येत होतं त्याची सगळी माहिती मिळत होती. काहीजण माझ्या चांगूलपणाचा फायदा घेतात हे लक्षात आलं. त्यावर मी आज काही बोलणार नाही. आमची यात्रा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होऊन सात वर्ष झाली. या सातवर्षात त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवलं ते सांगण्यासाठी ही यात्रा होती. दुसरं म्हणजे देशाच्या मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. राज्यातील आणि देशातील अनेक खासदारांना मंत्री बनवण्यात आलं. त्यांना मोदींनी सर्वांना आपापल्या राज्यात जनतेचं आशीर्वाद मागण्यास सांगितलं. तसंच तुमच्या खात्याला सुरुवात करण्यास सांगितलं. त्यानुसार आम्ही 19 तारखेपासून जनआशीर्वाद सुरु केली. मी कालपर्यंत यात्रेत होतो. दोन दिवस गॅप ठेवलाय. परवापासून यात्रा सुरु होईल, असे भाष्य राणे यांनी केले. संबंधित बातम्या

फडणवीस म्हणाले, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही, आता राणेंचं थेट उत्तर

आता स्वस्थ बसणार नाही, सालीयान प्रकरणातील ‘त्या’ मंत्र्याला आणि अनिल परबांना नारायण राणेंचा थेट इशारा

narayan rane criticized on shiv sena on gangster issue

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.