AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणेंनी घेतली राज्यपालांची भेट, म्हणतात ‘चर्चा झाली सांगायची नसते’

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राजभवनात ही भेट पार पडली. या भेटीत राणे आणि कोश्यारी यांच्यात काय चर्चा झाली याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली अशी माहिती राणे यांनी दिलीय.

नारायण राणेंनी घेतली राज्यपालांची भेट, म्हणतात 'चर्चा झाली सांगायची नसते'
NARAYAN RANE
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 10:29 PM
Share

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राजभवनात ही भेट पार पडली. या भेटीत राणे आणि कोश्यारी यांच्यात काय चर्चा झाली याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो अशी माहिती राणे यांनी दिलीय. तसेच इतर अनेक विषयांवर चर्चा झाली पण ती सांगायची नसते असे सूचक विधानदेखील त्यांनी केले.

ड्रग्स याविषयावर राज्य शासन कठोर भूमिका घेत नाही

नारायण राणे हे सातत्याने राज्यातील ठाकरे सरकारवर टीका करताना दिसतात. राज्याचा कारभार हाकण्यात राज्य सरकार सपेशल फोल ठरल्याचा दावा यापूर्वी अनेकवेळा केलाय. तसेच ठाकरे सरकार लकवरच पडणार असंदेखील ते म्हणताना दिसतात. आता याच ठाकरे सरकारचे खंदे टीकाकार नारायण राणे यांनी राज्यपालांची सोमवारी (8 ऑक्टोबर) भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली असं त्यांनी सांगितलं. तसेच त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या ड्रग्ज प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला. “ड्रग्स याविषयावर राज्य शासन कठोर भूमिका घेत नाही. सीएम ठाकरे काहीच भूमिका घेत नाहीत. ते बोलत नाहीत ?” असे राणे म्हणाले.

केंद्राच्या एजन्सी चुकीचे करत असतील तर पुरावे द्या

तसेच पुढे बोलताना त्यांनी “कोरोना हाताळण्यास राज्य शासन कमी पडले. बेकारीचा प्रश्न सोडविला पाहिजे. फक्त मोदी यांच्यावर टीका करून चालणार नाही. साधी बीएमसी हाताळता येत नाही. मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात. पण ते राजीनामे देत नाहीत, असा घणाघात  राणे यांनी केला. तसेच केंद्राच्या एजन्सी चुकीचे करत असतील तर पुरावे द्या, राज्य शासनाला काम करता येत नाही म्हणून टीका केली जातेय, असा दावादेखील त्यांनी केला.

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनिल परब सोडवू शकत नाहीत

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणि त्यांच्या मागण्यांवर बोलताना राणे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर बोचरा वार केला. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनिल परब सोडवू शकत नाहीत. ते फक्त समित्या स्थापन करू शकतात, असे राणे म्हणाले.

इतर बातम्या :

आता मी ढवळाढवळ करू का?, उदयनराजेंचा थेट राष्ट्रवादीसह विरोधकांना इशारा

VIDEO | अँटेलियाची सुरक्षा वाढवली, टॅक्सीवाल्याला लोकेशन विचारणाऱ्या संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरु

Covid Vaccine: 2-18 वर्षे वयोगटातील मुलांना Covaxin च्या मंजुरीसाठी DCGI कडून वेळ लागण्याची शक्यता

(narayan rane visited bhagat singh koshyari criticizes maharashtra government)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.