AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | राज्याच्या शिक्षण आयुक्तांचे तोंडभरून कौतुक; जिल्हाधिकारी गंगाथरन यांचे उत्साहात स्वागत…!

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, राज्य शासनाचे अनेकविध पथदर्शी कार्यक्रम जिल्ह्यात सूरज मांढरे यांनी यशस्वीपणे राबविले आहेत. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना मांढरे यांनी पथदर्शी कार्यक्रमांत नाशिक जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थान प्राप्त करून दिले आहे, ही अतिशय अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे.

Nashik | राज्याच्या शिक्षण आयुक्तांचे तोंडभरून कौतुक; जिल्हाधिकारी गंगाथरन यांचे उत्साहात स्वागत...!
नाशिकमध्ये सूरज मांढरे यांना निरोप देण्यात आला, तर गंगाथरन यांचे स्वागत करण्यात आले.
| Updated on: Mar 15, 2022 | 3:06 PM
Share

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) जिल्हाधिकारी (collector) सूरज मांढरे यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला, तर नवे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मांढरे यांची सध्या राज्याचे शिक्षण आयुक्त (education commissioner) म्हणून बदली झाली आहे. त्यांचा निरोप समारंभ आणि नव्याने पदस्थापना झालेले जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम झाला. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, मांढरे यांच्या सुविद्य पत्नी मयुरा मांढरे यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, विभाग प्रमुख, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मांढरे यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी नितीन मुंढावरे, तहसीलदार प्रदीप पाटील, तलाठी संघटनेचे अध्यक्ष उगले, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ, नायब तहसीलदार मोराणकर उपस्थित होते.

कोरोनात उल्लेखनीय काम

निरोप समारंभात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, राज्य शासनाचे अनेकविध पथदर्शी कार्यक्रम जिल्ह्यात सूरज मांढरे यांनी यशस्वीपणे राबविले आहेत. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना मांढरे यांनी पथदर्शी कार्यक्रमांत नाशिक जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थान प्राप्त करून दिले आहे, ही अतिशय अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. त्यांचे हे काम प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरेल. विधानसभा, लोकसभा निवडणूक काळातील मांढरे यांचे काम उत्तम होतेच. कोरोना सारख्या महामारीच्या काळातही मांढरे यांनी सर्वच परिस्थितीचे योग्य नियोजन करून अतिशय संवेदनशीलपणे काम केले आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन असो किंवा जिल्ह्याला ऑक्सिजनच्या बाबती स्वयंपूर्ण करण्यासाठीचे यशस्वी प्रयत्न उल्लेखनीय आहेत, असा उल्लेख त्यांनी केला.

शिक्षण विभागाला गतवैभव मिळेल

आयुक्त गमे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीच्या काळात देखील शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवा यासाठी देखील त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. काळाची पावले ओळखून त्यांनी तंत्रज्ञानाच्या साथीने जिल्हा प्रशासनात अनेक अमुलाग्र बदल करून पेपरलेस ऑफिस बनविण्यावर भर दिला. याचप्रमाणे मांढरे यांना बदलीने मिळालेले राज्याचे शिक्षण आयुक्त पदाच्या कामकाजातून देखील ते त्यांच्या कुशल नेतृत्वाने शिक्षण विभागाला गतवैभव प्राप्त करून देतील अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिमवर्कमुळे झाले शक्य

सत्काराला उत्तर देताना सूरज मांढरे म्हणाले की, प्रशासकीय सेवेत काम करताना कोणतीही व्यक्ती श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. आपल्या पदाची गरिमा सांभाळून प्रामाणिकपणे काम करणे महत्त्वाचे आहे. या तत्त्वानुसार मी नाशिक जिल्ह्यात माझ्या टिमच्या माध्यमातूनच नियोजबद्ध व अधिक पारदर्शकपणे काम करू शकलो. नाशिकमध्ये काम करतांना सर्वच यंत्रणांकडून मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे कोरोना संकट काळात त्याचप्रमाणे निवडणूकीच्या काळात मी अधिक प्रभावीपणे व पूर्ण क्षमतेने काम करू शकलो. प्रशासनात काम करताना कामाच्या स्वरूपानुसार अधिकारी व कर्मचारी यांचे मुल्यांकन केल्यास ते अधिक प्रभावी ठरते याचा प्रत्यक्ष अनुभव नाशिकमध्ये काम करताना आला. कोरोना काळात साथरोग कायदा लागू केला. त्याचप्रमाणे मजुरांसाठी कॅम्प्सचे आयोजन करून नियोजित स्थळी त्यांना पोहचविण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले असून, यामुळे जिल्ह्याची प्रतिमा उंचावली आहे. राज्यस्तरीय बैठकांमध्ये नाशिकचा उल्लेख प्रथम स्थानी घेतेले जाते, याचा उल्लेख केला.

स्वत:चा व्यासंग महत्वाचा

सूरज मांढरे म्हणाले की, नाशिकमध्ये काम करताना, वरिष्ठांचा स्नेहासोबतच कामातील उणिवा त्यावर मार्गदर्शक सूचना हे कायम लाभले आहे. शासकीय मदत दूत हा उपक्रम राबविताना जिल्ह्याचा संवेदनशील प्रशासन म्हणून गौरव झाला, ही बाब गौरवास्पद आहे. नाशिकच्या कार्यकाळात पालकमंत्री, लोकप्रतिनीधी व नागरिक यांचे सहकार्य कायम स्मरणात राहील. शासकीय नोकरी करताना स्वत:चा व्यासंग महत्वाचा असून व्यक्ती म्हणून आपला उपयोग झाला पाहिजे, असे काम प्रत्यकाने करावे, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

कोरोना काळातील नियोजन आदर्श

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले की, कोरोना काळात जिल्हा प्रशासनाचे नियोजन हे आदर्श असून, नाशिक सर्वच स्तरावर अव्वल स्थानावर राहिले आहे. महसूल विभागात आर्थिक वर्षातील महसूल वसुलीची उद्दीष्टपूर्ती करणे आव्हानात्मक काम असते, परंतु ही उद्दीष्टपूर्तीचे काम सूरज मांढरे यांच्या नियोजनामुळे मार्च अखेरपूर्वीच पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी पदावर काम करताना हा वारसा असाच सक्षमतेने पुढे घेऊन जाण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. शासनात काम करताना प्रत्येकाला आपल्या आवडीचे क्षेत्र मिळेलच असे नाही, परंतु आवडीच्या क्षेत्रात राज्याचे शिक्षण आयुक्त या पदावर सूरज मांढरे यांची नियुक्ती झाली आहे. या क्षेत्रात काम करताना मांढरे नक्कीच आपला वेगळा ठसा उमटवतील यात शंका नाही.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

Video | ‘अभिव्यक्ती’ म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नव्हे, संविधानाचा गैरअर्थ नको; उज्ज्वल निकमांकडून कोर्टाचे स्वागत

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.