Nashik | कंपन्या, शेतकऱ्यांना मिळणार सिंचनासाठी पाणी; कसा अन् कुठे कराल अर्ज, घ्या जाणून

कंपन्या आणि शेतकऱ्यांना मध्यम प्रकल्पावरील आरक्षित पाण्याव्यतिरिक्त पाणी देण्यात येणार आहे. त्यासाठी जवळच्या शाखा कार्यालयात पाणी अर्ज सादर करावे, असे आवाहन मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

Nashik | कंपन्या, शेतकऱ्यांना मिळणार सिंचनासाठी पाणी; कसा अन् कुठे कराल अर्ज, घ्या जाणून
संग्रहित छायाचित्र.

नाशिकः कंपन्या आणि शेतकऱ्यांना मध्यम प्रकल्पावरील आरक्षित पाण्याव्यतिरिक्त पाणी देण्यात येणार आहे. रब्बी हंगाम 2021-22 मध्ये पिण्यासाठी आणि औद्योगिक वापरासाठी मालेगाव पाटबंधारे विभाग, कार्यकक्षेतील चणकापूर मोठा प्रकल्प तसेच हरणबारी, केळझर व नाग्यासाक्या या मध्यम प्रकल्पावरील पाण्यातून सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी 15 डिसेंबर 2021 पर्यंत सायंकाळी 5.30 पर्यंत जवळच्या शाखा कार्यालयात पाणी अर्ज सादर करावे, असे आवाहन मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

नमुना नं. 7 चा पाणी अर्ज सादर करा

मालेगाव पाटबंधारे विभाग, कार्यकक्षेतील मध्यम व लघु प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठ्यातून सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या पाण्याचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी नमुना नं. 7 चा पाणी अर्ज सादर करून रितसर पोहच पावती घेणे आवश्यक आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे कळवण्यात आले आहे. पाणी आरक्षणाची मंजुरी महाराष्ट्र सिंचन कायदा 1976 व प्रचलित नियमास अनुसरून असणार असून, यासाठी शेतकऱ्यांनी उभी पिके व चारा घेवून शासनास सहकार्य करावे, असेही मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी आवाहन केले आहे.

या अटींचे पालन गरजेचे

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठरणाऱ्या नियोजनानुसार सिंचनाचे नियोजन करण्यात येणार आहे. चणकापूर प्रकल्पावार सिंचनासाठी एक आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार मर्यादित क्षेत्रासाठी आवर्तनाचे नियोजन करण्यात येईल. पाण्याचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होणार नाही, याची सर्व संबधितांनी दक्षता घ्यावी लागणार आहे. पाटमोट संबधाच्या जागी मागणी असेल तेथे पाणी पुरवठा केला जाणार नाही. पाण्याची नासाडी केली किंवा बिनअर्जी क्षेत्रास पाणी घेतल्याचे आढळल्यास संबधितांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

तर मंजुरी नाही

बिनअर्जी तीन गुन्ह्यांमुळे काळ्या यादीत नाव असेल त्यांना मंजुरी दिली जाणार नाही. थकबाकीदारांबाबत शासनाच्या आदेशानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पाणी अर्ज नंबर 7 सोबत 7/12 उतारा जोडणे अनिवार्य राहील. 7/12 उतारा ज्यांचे नावे असेल त्याच्याच नावे पाणी अर्जास मंजुरी दिली जाणार आहे. उपसा, ठिबक, तुषार सिंचन धारकांना नियोजनानुसार पाणीपुरवठा करण्यात येईल. आरक्षणामुळे आवर्तनातमध्ये फेरबदल करावा लागल्यास, पिकाचे उत्पन्न कमी आसल्यास किंवा नुकसान झाल्यास याबाबत खात्याची कोणतीही जबाबदारी राहणार नाही. पाणी अर्जावर आधारकार्ड व मोबाईल नंबर टाकणे अनिवार्य आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

नगरसेवकानंतर आता नाशिक झेडपीचे गट 12 ने वाढणार; सदस्यसंख्या 85 होणार

नाशिक जिल्ह्यात 464 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; एका रुग्णाचा मृत्यू

Published On - 4:27 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI