Nashik Corona : नाशिक पालिकेचं कोरोनासाठी पोर्टल; बेड , रेमडेसिव्हीर कुठे आणि कसं मिळणार, हेल्पलाईन नंबरही जारी

देशातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्णसंख्या असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये नाशिकचा समावेश आहे. Nashik Corona Update

Nashik Corona : नाशिक पालिकेचं कोरोनासाठी पोर्टल; बेड , रेमडेसिव्हीर कुठे आणि कसं मिळणार, हेल्पलाईन नंबरही जारी
नाशिक कोरोना अपडेट
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 3:55 PM

नाशिक: देशातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्णसंख्या असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये नाशिकचा देखील समावेश आहे. नाशिक जिल्ह्याती कोरोना रुग्णसंख्या 2 लाखांवर पोहोचली आहे. नाशिकमध्ये 6 एप्रिलपर्यंतची कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 2 हजार 110 वर पोहोचली आहे. तर, 1 लाख 68 हजार 82 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नाशिकमध्ये आतापर्यंत 2239 रुग्णांचा मृत्यू झालाय. शहरात सध्या 31 हजार 688 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यात आणि शहरातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानं बेड मिळण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर, नाशिक महापालिकेने बेडची माहिती देणारी वेबसाईट तयार केली आहे. (Nashik covid19 corona cases, test, corona report, corona dashboard How to get covid bed in Nashik all you need to know)

नाशिक महापालिकेच्या वेबसाईट वर बेडस उपलब्ध पण, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी

नाशिक महापालिकेने शहरातील बेडची संख्या दाखवण्यासाठी एक पोर्टल तयार केलं आहे. रुग्णालयांना त्यावर माहिती अपडेट करायला सांगितली आहे. मात्र, रुग्णालयांकडून माहिती अपडेट केली जात नसल्यानं वेबसाईटवर बेड रिकामे दाखवते आणि रुग्णालयात पोहोचल्यानंतर प्रत्यक्षात बेड उपलब्ध नसतो. http://covidcbrs.nmc.gov.in/home/hospitalSummary ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटवर बेड उपलब्ध असल्याबाबत माहिती मिळेल. पालिकेने 9607623366 / 9607432233 / 0253-2317292 / 7030300300 हे क्रमांक दिले आहेत.

नाशिकमध्ये 640 बेड वाढवण्यात येणार

जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्वी 110 खाटांची क्षमता होती. तेथे आता 90 बेड वाढविल्याने 200 बेडची क्षमता झाली आहे. तसेच बिटको रुग्णालयात 300, तसेच नाशिकरोड येथील अग्निशमन दलाची इमारत व भक्तनिवास या कोविड केअर सेंटरमध्ये 250 असे एकूण 640 अतिरिक्त बेडची वाढ करण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये कोरोना चाचणी कशी होते? (How to do corona test in Nashik)

एखाद्याला लक्षणे असली किंवा तो कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला असेल आणि त्याला टेस्ट करायची असेल तर नाशिक विविध ठिकाणी कोरोना चाचणी केली जाते. नाशिकमध्ये टेस्ट करण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये वेगवेगळी केंद्र उघडली आहेत. त्या ठिकाणी RTPCR आणि अँटिजन टेस्ट केली जाते. सोबतच खाजगी रुग्णालय ज्यांना कोव्हिड रुग्णालय जाहीर केलं आहे, तिथे काही खाजगी लॅबमध्ये सुद्धा टेस्ट केली जाते.

नाशिकमध्ये टेस्ट कशी होते, किती वेळ लागतो, रांगा आहेत का? (Nashik que for corona test)

नाशिकमध्ये RTPCR आणि अँटिजन टेस्ट केली जात आहेत. टेस्टिंग सेंटर जास्त असल्याने फार रांगा नाही मात्र गर्दी असते

रेमडेसिव्हीर मिळतं का? त्यांचे दर, रुग्णालयांची फी वगैरे सगळं

नाशिक महापालिकेने या लिंकवर https://nmc.gov.in/article/index/id/172 रेमडेसिव्हीर इंजेक्शन कुठे मिळेल याची माहिती उपलब्ध करुन दिली आहे. नाशिक महापालिकेने ही माहिती 5 एप्रिल रोजी अपडेट केली आहे. त्यानुसार 79 कोव्हिड रुग्णालय, 34 मेडिकल्सकडील उपलब्ध साठ्याची माहिती दिली आहे. तर, 10 रिटेल विक्रेत्यांची माहिती शेअर केली आहे. सध्या नाशिकमध्ये रेमडेसिव्हीरचा तुटवडा भासत असून मेडिकलमध्ये रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. नाशिक जिल्हा प्रशासनानं नागपूरमधून रेमडेसिव्हीर औषधं मागवली होती.

टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी किती वेळ लागतो? तोपर्यंत रुग्णाने काय करायचं?

RTPCR टेस्टसाठी 1 ते 2 तास लागतात. या चाचणीचा रिपोर्ट 24 तासानंतर येतो. तर अँटिजन टेस्ट 20 मिनिटात होते, आणि या चाचणीचा रिपोर्टही 1 ते 2 तासात येतो. टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत रुग्णाला विलगीकरणात राहायचं असते.

एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर रुग्णाने कुठे जायचं? महापालिका त्याला घेऊन जाते की स्वत:ला जावं लागतं?

रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एकतर रुग्णाला लक्षणे कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विलगीकरणात राहता येते. लक्षणे जास्त असल्यास कोव्हिड केअर सेंटरला भरती करण्यात येते. सेंटरला रुग्ण स्वतः जाऊ शकतो किंवा माहिती दिल्यास महापालिका रुग्णवाहिका पाठविते.

रुग्णांना कुठे पाठवलं जातं? कोव्हिड सेंटर किंवा तत्सम

ज्यांना खाजगी रुग्णालयात जायचं असेल ते तिकडे जाऊ शकतात किंवा मग कोव्हिड केअर सेंटर उभारले आहेत.

नाशिकमध्ये रेमडेसिव्हीरसाठी रांगा

कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा मोठा तुटवडा नाशिकमध्ये निर्माण झाला आहे.नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना रेमडिसिव्हर मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक चांगलेच हैराण झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील हॉस्पिटल आणि मेडिकलला रेमडिसिव्हर पूरवठा करनाऱ्या नाशिकमधील प्रमुख फार्मा बाहेर रेमडिसिव्हर घेण्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि अचानक झालेला कोरोनाचा उद्रेक या मुळे हे भयावह चित्र निर्माण झालं आहे.अनेक नागरिक पहाटे पासून रांगा लावून फार्मा दुकानांबाहेर उभे होते.

संबंधित बातम्या:

Nagpur Corona : पालिकेचे हेल्पलाईन नंबर बंद, नागपूरमध्ये बेड कुठे आणि कसा मिळणार, संपूर्ण माहिती

कोरोना वाढतोय, नाशिकमध्ये रुग्णांसाठी बेड्सचं नियोजन कसं? मंत्री भुजबळांकडून आढावा, 640 बेड्स वाढवले

(Nashik covid19 corona cases test corona report corona dashboard How to get covid bed in Nashik all you need to know)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.