नाशिकमधल्या 2 ठिकाणी 31 मार्च रोजी जाणे टाळा, अन्यथा जीवावर बेतू शकते; का दिला इशारा?

नाशिकमधल्या 2 ठिकाणी 31 मार्च रोजी जाणे टाळा, अन्यथा जीवावर बेतू शकते; का दिला इशारा?
प्रातिनिधिक छायाचित्र.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि एक्स सेक्टर या ठिकाणी 31 मार्च रोजी जाणे टाळे, असे आवाहन करण्यात आले आहे. जनरल स्टाफ ऑफिसर ट्रेनिंग मुख्यालय तोफखाना आणि देवळाली कॅम्प आर्टिलरी स्कूल तर्फे या ठिकाणी गुरुवारी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत गोळीबाराची प्रात्यक्षिके केली जाणार आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Mar 26, 2022 | 3:01 PM

शैलेश पुरोहित, इगतपुरीः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) आणि एक्स सेक्टर या ठिकाणी 31 मार्च रोजी जाणे टाळे, असे आवाहन करण्यात आले आहे. जनरल स्टाफ ऑफिसर ट्रेनिंग (Training) मुख्यालय तोफखाना आणि देवळाली कॅम्प आर्टिलरी स्कूल तर्फे या ठिकाणी गुरुवारी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत गोळीबाराची प्रात्यक्षिके केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात नागरिकांनी प्रवेश करू नये, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले आहे. इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द, अधरवड, बेलगाव तऱ्हाळे, सोनोशी, अडसरे खुर्द, बारशिंगवे, तळवाडी, कवडदरा, समनेरे, घोटी खुर्द, लहान घोटीची वाडी, नांदुरवैद्य, टाकेद बुद्रुक, धामणगाव, नांदगाव बुद्रुक, साकुर, बेलगाव कुऱ्हे, मालुंजे, गंभीरवाडी, भरवीर खुर्द, लहवित, अस्वली व नाशिक तालुक्यातील वंजारवाडी या गावांचे मालकी हद्दीतील काही भाग तोफा माऱ्याच्या रेषेत येतात. त्यामुळे हे आवाहन करण्यात आले आहे.

अन्यथा कारवाई करणार

गोळीबार प्रात्यक्षिकाच्या कालावधी दरम्यान संबंधित ‘एक्स सेक्टर’ क्षेत्रात गावातील नागरिकांना जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या क्षेत्रात जनावरांनाही जाऊ देवू नये. याबाबत संबंधित ग्रामपंचायत प्रशासनास दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. तशी जाहीर दवंडीही देण्यात येणार आहे. प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रात प्रवेश केल्यास प्राण धोक्यात येऊन हानी झाल्यास त्याची जबाबदारी शासनाची राहणार नाही. या सूचनेचा भंग केल्यास संबंधित व्यक्तिविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अपर जिल्हादंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि एक्स सेक्टर या ठिकाणी 31 मार्च रोजी जाणे टाळे, असे आवाहन करण्यात आले आहे. जनरल स्टाफ ऑफिसर ट्रेनिंग मुख्यालय तोफखाना आणि देवळाली कॅम्प आर्टिलरी स्कूल तर्फे या ठिकाणी गुरुवारी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत गोळीबाराची प्रात्यक्षिके केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात नागरिकांनी प्रवेश करू नये. अन्यथा कायदेसीर कारवाई करण्यात येईल.
– भागवत डोईफोडे, अपर जिल्हादंडाधिकारी

इतर बातम्याः

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें