AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरातच्या बंगल्याच्या झडतीत सापडली धक्कादायक गोष्ट; कोणाला थांगपत्ता लागू न देता करायचा हे काम

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या तृप्तबाला बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. यात १३१ बनावट बँक खाती आणि असंख्य बनावट आधार-पॅन कार्ड जप्त केली आहेत. आर्थिक फसवणूक आणि लैंगिक शोषण प्रकरणात खरातच्या अडचणी वाढल्या असून पोलिसांकडून सविस्तर तपास सुरू आहे.

अशोक खरातच्या बंगल्याच्या झडतीत सापडली धक्कादायक गोष्ट; कोणाला थांगपत्ता लागू न देता करायचा हे काम
ashok kharat
| Updated on: Apr 07, 2026 | 9:38 AM
Share

अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याचे काळे कारनामे एकामागून एक समोर येत आहेत. लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरातच्या घर आणि कार्यालयावर पोलिसांनी छापेमारी केली आहे. पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात केवळ कागदपत्रांचा खजिनाच नाही, तर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे जाळेही समोर आले आहे.

तब्बल १३१ बनावट बँक खाती

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अशोक खरातच्या नाशिकमधील तृप्तबाला बंगल्याची झडती घेतली. या झडतीत पोलिसांना असंख्य आधार कार्ड आणि पॅनकार्ड मिळाले आहेत. या कागदपत्रांचा वापर करून अशोक खरातने बनावट बँक खाती उघडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्राथमिक तपासात तब्बल १३१ बनावट बँक खाती उघडल्याचे समोर आल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या झेरॉक्स घ्यायचा अन्…

अशोक खरात हा आपल्याकडे येणाऱ्या भक्तांकडून विविध विधी किंवा कामांच्या बहाण्याने आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या झेरॉक्स घेत असे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे काही पंटर (सहकारी) जाणीवपूर्वक भक्तांची वैयक्तिक माहिती गोळा करत होते. या कागदपत्रांचा गैरवापर करून अनेक भक्तांच्या नावावर बनावट बँक खाती उघडण्यात आली. अनेक खात्यांना स्वतःचाच मोबाईल नंबर लिंक करून आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण मिळवले. तसेच पतसंस्थांमधील खात्यांवर स्वतःला नॉमिनी लावून भविष्यातील आर्थिक लाभाचे नियोजन केले.

केवळ नाशिकच नव्हे, तर अहिल्यानगर आणि पुणे या ठिकाणीही अशाच प्रकारची बनावट खाती उघडण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका लैंगिक शोषण प्रकरणातील पीडितेने दिलेल्या जबाबातून या प्रकरणाला वाचा फुटली. त्यानतंर आता हे संपूर्ण प्रकरण एका मोठ्या संघटित गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहे.

आणखी काही मोठे मासे अडकण्याची शक्यता

सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. यानंतर भक्तांना टार्गेट करून त्यांची फसवणूक करण्यासाठी अशोक खरातने हे आर्थिक जाळे विणल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या छाप्यातून मिळालेल्या पुराव्यांमुळे अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यामागे आणखी काही मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us
एकच खळबळ! गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, हे नेमकं...
एकच खळबळ! गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, हे नेमकं....
लवकर आटपा बोलणं झोंबलं... भुजबळ- तटकरेंची सुनेत्रा वहिनींसमोरच जुंपली
लवकर आटपा बोलणं झोंबलं... भुजबळ- तटकरेंची सुनेत्रा वहिनींसमोरच जुंपली.
ठाणे ते रायगड….विधान परिषदेसाठी शिंदे गटात या नावांची जोरदार चर्चा
ठाणे ते रायगड….विधान परिषदेसाठी शिंदे गटात या नावांची जोरदार चर्चा.
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.