नाशिकच्या रुग्णालयातील अर्धनग्न आंदोलन, जितेंद्र भावेंविरोधात गुन्हा दाखल

नाशिकच्या वोकहार्ड रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी जितेंद्र भावे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jitendra Bhave Agitation in Hospital Nashik)

नाशिकच्या रुग्णालयातील अर्धनग्न आंदोलन, जितेंद्र भावेंविरोधात गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 2:01 PM

नाशिक: नाशिकच्या एका नामांकित हॉस्पिटलने कोरोनाबाधित रुग्णांकडून अवाजवी बिल आकारल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांनी करत अर्धनग्न आंदोलन केलं होतं. या आंदोलन प्रकरणी जितेंद्र भावे आणि समर्थकांवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र भावे यांच्यावर कलम 188 आणि बेकायदेशीर रित्या गर्दी जमवणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र भावे यांनी मंगळवारी नाशिकमधील नामांकित रुग्णालयात हॉस्पिटलच्या बिलाच्या मुद्यावरुन आंदोलन केलं होतं. (Nashik Mumbai Naka Polices Station register case against Jitendra Bhave regarding agitation in Hospital)

जितेंद्र भावे याचं मत काय?

नाशिक पोलिसांनी जितेंद्र भावे यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. नाशिककरांच्या रेट्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिलं. जितेंद्र भावे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना जितेंद्र भावे यांनी भारतीय वैद्यकीय व्यवस्थेतील चुकीच्या कामांविषयी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. “एकंदरीतच कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जो चाललेला खेळ आहे आणि तिथे रुग्णाचे कपडे काढले जातात रोजच्या रोज रुग्णाच्या नातेवाईकांची कपडे काढले जात आहेत. कॉर्पोरेट हॉस्पिटल आणि त्यांच्या पंखाखाली असलेले त्यांच्या पॅथॉलॉजिकल लॅब, त्यांच्या पंखाखाली असलेली डायग्नोस्टिक लॅब, चालू असलेले इतर वैद्यकीय व्यवसाय आणि कट प्रॅक्टिस या सगळ्यामुळे भारतीय माणूस पुरता नागवला गेला आहे. एक भारतीय माणूस आणि मी त्याचं प्रतीक म्हणून ते कपडे काढले होते. त्या माणसाला त्याचा हक्काचा डिपॉझिट परत मिळत नव्हतं आणि ते डिपॉझिट घेतल्याशिवाय त्या मुलाच्या आईवडिलांनीही अ‌ॅडमिशन दिलं नव्हतं.”,असं जितेंद्र भावे म्हणाले.

9 रुपयांचे ग्लोव्हज 64 रुपयांना

“कॉर्पोरेट हॉस्पिटलला भस्म्या रोग झाला आहे. 9 रुपयांना मिळणारे साधे ग्लोव्हज त्याची किंमत 64 रुपये लावली. डोक्यावर टाकायची टोपी 64 रुपयांना लावले आहे. एचआरसीटी हजार रुपयांत लोकांना मिळते तिथे पाच हजार रुपये घेतले जात आहेत,” असा आरोप जितेंद्र भावे यांनी केला.

जितेंद्र भावे यांचं कपडे काढून अर्धनग्न आंदोलन

जितेंद्र भावे यांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत ठिय्या आंदोलन केलं. भावे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. इन्शुरन्स कंपनीकडून बिल मिळून ही हॉस्पिटलने अॅडव्हान्स 1 लाख 50 हजार रुपये परत देण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. मात्र हे अवाजवी बिल लावलं आहे, असा रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप आहे. त्यामुळे अॅडव्हान्स दीड लाख रुपये तरी परत द्यावी, अशी मागणी जितेंद्र भावे यांनी केली होती.

संबंधित बातम्या:

VIDEO: नाशिकच्या खासगी रुग्णालयाकडून आकारलं जातंय अवाजवी बिल, सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप

कोरोना रुग्णांच्या मदतीला जैन समाजबांधव धावले, नाशिकच्या पिंपळगावात महिनाभरापासून अन्नदानाचा उपक्रम

(Nashik Mumbai Naka Polices Station register case against Jitendra Bhave regarding agitation in Hospital)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.