Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत नाशिकमध्ये फिरून दाखवावं, संजय राऊतांचे आव्हान

नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा काढण्यात येत आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना नाशिकमधील ड्रग्जची समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि पाणीटंचाई यासारख्या समस्यांवर लक्ष देण्याचे आव्हान दिले आहे. मोर्चात नाशिकच्या विकासाच्या अभावावरही निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. राऊत यांनी फडणवीसांना विरोधी पक्षांच्या नेत्यांसह शहरात फिरून परिस्थिती पाहण्याचे आव्हान दिलं.

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत नाशिकमध्ये फिरून दाखवावं, संजय राऊतांचे आव्हान
संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 12, 2025 | 10:38 AM

नाशिक जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या, समस्यांच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतर्फे संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात संजय राऊत , बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक पादधिकारी, कार्यकर्तेय उपस्थित राहणार आहेत. त्याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत नाशिकमध्ये फिरून दाखवावं असं ते म्हणाले. नाशिक हे शहर विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतलंय. पण त्याच नाशिकमध्ये आज अराजकता आहे, पाणी नाही, ड्रग्सची समस्या आहे, शेतकऱ्यांच्या आमत्हत्या वाढल्या आहे, अशा अनेक समस्यांचा पाढाच राऊतांनी यावेळी वाचून दाखवलं.

काय म्हणाले संजय राऊत ?

नाशिकमध्ये शिवसेना सक्रिय आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा नाशिक मध्ये जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत असते . खरंतर नाशिक पवित्र धार्मिक स्थान आहे, इथे कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. नाशिक श्रीरामाच्या नावाने ओळखले जातं, ते कुसुमाग्रजांच्या नावाने विख्यात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने ओळखले जाणारं देखील हे शहर आहे. पण याच नाशिकमध्ये जी अवस्था आहे, जी परिस्थिती झालेली आहे त्याच्या विरोधात या आधी देखील आंदोलनाला झाली. आणि आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये ड्रग्स विरोधात अराजकता निर्माण होत चालली आहे. त्याच्या विरोधात आम्ही मोर्चा काढत आहोत असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसोबत फिरुन दाखवावं

नाशिकमध्ये महानगरपालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे त्यामुळे नाशिक शहराची पूर्ण वाट लागली आहे. या शहरात लोकांना पाणी नाही, रस्ते नाही, सुविध नाहीत. गुंडगिरी वाढली आहे. नाशिकमध्ये खुलेआम ड्रग्स, एमडी ड्रग्सचा व्यापार सुरू आहे. तरूण मुलांना ही ड्रग्स सहज उपलब्ध होत आहेत. या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. आणि हेच नाशिक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे शहर देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेलं आहे, तेही विकासासाठ असं ऐकवत, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्यासोबत नाशिकमध्ये फिराव असं आव्हान राऊत यांनी दिलं. मग फडणवीसांनी शहरातील परिस्थिती जाणून घ्यावी, असेही ते म्हणाले.