Nashik School Reopen: आवडते मज अफाट शाळा; आजपासून वर्गात पुन्हा किलबिलाट…!

एक अतिशय जिव्हाळ्याची, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात हुरुप आणत आनंदाचे वातावरण तयार करणारी ही बातमी. होय, अखेर कोरोनाला (Corona) चित करून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आजपासून पुन्हा एकदा शाळांचा श्रीगणेशा होत आहे.

Nashik School Reopen: आवडते मज अफाट शाळा; आजपासून वर्गात पुन्हा किलबिलाट...!
School
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 7:07 AM

नाशिकः एक अतिशय जिव्हाळ्याची, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात हुरुप आणत आनंदाचे वातावरण तयार करणारी ही बातमी. होय, अखेर कोरोनाला (Corona) चित करून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आजपासून पुन्हा एकदा शाळांचा श्रीगणेशा होत आहे. एकीकडे लसीकरण आणि टेस्टिंग वाढवण्यासाठी दिलेली गती, निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्धार आणि दुसरीकडे शिक्षणाची खांद्यावर पालखी असे आशादायी चित्र सध्या तरी आहे. राज्याच्या इतर भागातही सगळीकडे लवकरच हेच चित्र दिसावे. वर्गावर्गांमध्ये मुलांचा किलबिलाट रंगावा आणि पुन्हा एकदा ती घंटी कधी वाजेल म्हणून इतर विद्यार्थीही आतुरतेने वाट पाहतायत.

नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्ण

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत रविवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 21 हजार 515 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 16 हजार 663 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 780 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 834, बागलाण 207, चांदवड 227, देवळा 251, दिंडोरी 398, इगतपुरी 359, कळवण 145, मालेगाव 250, नांदगाव 288, निफाड 1 हजार 6, पेठ 75, सिन्नर 599, सुरगाणा 49, त्र्यंबकेश्वर 194, येवला 274 असे एकूण 5 हजार 156 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 10 हजार 815, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 348 तर जिल्ह्याबाहेरील 344 रुग्ण असून असे एकूण 16हजार 663 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 46 हजार 958 रुग्ण आढळून आले आहेत.

काय आहेत सूचना?

बालकांमधील संक्रमणाची आत्तापर्यंतची टक्केवारी ही केवळ 10 टक्के एवढीच असल्याने जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, बालकांच्या आरोग्याशी कुठल्याही शाळा प्रशासनाने व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तडजोड न करता शाळा सुरू करताना बारकाईने नियंत्रण व निरीक्षणाची आवश्यकता आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. शिवाय मुलाला कोरोनाची लक्षणे असली किंवा कोणाला कोरोनाची लागण झाली, तर शाळा बंद ठेवण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

येथे सुरू होतायत शाळा…

– नाशिक

– औरंगाबाद

– भिवंडी

– मीरा भाईंदर

– उल्हासनगर

– नवी मुंबई

– कल्याण डोंबिवली

– ठाणे

– मुंबई

इतर बातम्याः

Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!

Nashik Trees | पर्यावरण मंत्र्यांच्या एका सूचनेमुळे 200 वर्षे पुरातन वटवृक्षासह 450 झाडे वाचणार, प्रकरण काय?

Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी सुरू!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.