“रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी द्या”, नाशिकमध्ये महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबचे आंदोलन

रेस्टॉरंट रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी यासाठी आज (4 ऑगस्ट) महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

"रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी द्या", नाशिकमध्ये महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबचे आंदोलन
NASHIK PROTEST

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील रेस्टॉरंट पूर्णपणे बंद होती. त्यानंतर रेस्टॉरंट चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. तसेच चारनंतर रात्री नऊ वाजेपर्यंत पार्सल सेवा देण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, सध्या नवे नियम जारी केलेले असले तरी यामध्ये रेस्टॉरंट्सना कुठलीही नवीन सवलत दिलेली नाही. कोणतीही सवलत न दिल्यामुळे आता हॉटेल, रेस्टॉरंट्सच्या मालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. रेस्टॉरंट रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी यासाठी आज (4 ऑगस्ट) महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आले. (agitation organized by Maharashtra Restaurant Club today demands to get permission to continue restaurant till 10 pm)

रेस्टॉरंट्सच्या बाबतीत कुठलीही नवीन सवलत दिलेली नाही

राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत नुकतेच नवे नियम जारी केले आहेत. या नियमांमध्ये राज्य सरकारने विविध आस्थपनांना काही प्रमाणात सूट दिली आहे. यामध्ये सोमवार ते शुक्रवार या कालावधीत शहरातील सर्व मॉल्स सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नव्या नियमांमध्ये रेस्टॉरंट्सच्या बाबतीत कुठलीही नवीन सवलत दिलेली नाही. हाच मुद्दा घेऊन आज नाशिकमध्ये महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात काळे कपड़े घालून हातात निषेधाचे फलक घेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

बहुतांश उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसला

सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत हॉटेल व्यवसायाला दिलेली परवानगी मान्य नाही. गेले 4 महिने कुठलीही आवक नसल्याने या व्यवसायावर अवलंबून असणार्‍या बहुतांश उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारने स्वीकारायला हवी. तसेच रेस्टॉरंट क्षेत्रास स्वतंत्र आर्थिक पॅकेजची घोषणा करावी. रेस्टॉरंट व्यवसायाला दुजाभाव न देता रात्री 10 वाजेपर्यंत आसन व्यवस्थेसह रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, अशा विविध मागण्या महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबने केल्या आहेत.

रेस्टॉरंट व्यवसाय चालविण्यासाठी सायंकाळचीच वेळ योग्य

दरम्यान, रेस्टॉरंट व्यवसाय चालविण्यासाठी सायंकाळचीच वेळ योग्य असते. अशातच दुपारी 4 नंतर बैठक व्यवस्थेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे सरकारने रेस्टॉरंट व्यवसायाशी निगडीत सर्वच व्यावसायिकांचा पोटमारा करण्याचे योजिले आहे, असे मत सर्वच रेस्टॉरंट व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या :

HSC Result 2021 Maharashtra Pass Percentage: 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के तर 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; वाचा, 12वीचा सविस्तर निकाल

VIDEO : बीड जिल्ह्याचं नाव केलंss, लोकनेत्याच्या लेकीनंss, किशाबाईंच्या आवाजात पंकजा मुंडेंवर भन्नाट गाणं

मोठी बातमी: RBIकडून जुन्या नोटा आणि नाण्यांसंदर्भात अलर्ट जारी, तुम्हीही व्हा सावध

(agitation organized by Maharashtra Restaurant Club today demands to get permission to continue restaurant till 10 pm)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI