Dada Bhuse : जेव्हा कृषिमंत्री जुगार अड्डा उध्वस्त करतात तेव्हा…मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील प्रकार

गेल्या काही महिन्यांपूर्वी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्वतः भुसे यांनी अशीच एक कारवाई केली होती. या घटनेला काही महिन्याचा काळ लोटला नाही तितक्यात पुन्हा अशीच धडाकेबाज कारवाई भुसे यांनी केली आहे. मग जे भुसे ना दिसते ते मालेगाव तालुका पोलिसांना दिसत नसेल का? असा प्रश्न सर्वसामान्य मालेगावकरांना पडल्या वाचून राहत नाही.

Dada Bhuse : जेव्हा कृषिमंत्री जुगार अड्डा उध्वस्त करतात तेव्हा...मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील प्रकार
जेव्हा कृषिमंत्री जुगार अड्डा उध्वस्त करतात तेव्हा...Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 6:24 PM

मालेगाव : नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आक्रमक असलेले आणि वेशांतर करुन बाजार समितीत स्टिंग केल्यामुळे चर्चेत आलेले कृषीमंत्री दादा भुसे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अनधिकृत जुगार अड्ड्या (Gambling Den)वर भुसेंनी थेट कारवाई करत हा अड्डा उद्धवस्त केला. हे घडलंय मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे. कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे मतदान संघातील झोडगे येथे एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. त्यावेळी गावात अनधिकृत जुगार अड्डा सुरू झाल्याने युवा पीढी जुगाराच्या आहारी जाऊन आपले आयुष्य उध्वस्त करीत असल्याची व्यथा तेथील काही जाणकार ग्रामस्थांनी मांडली. यावर क्षणाचा देखील वेळ न घालवता दस्तुरखुद्द भुसे यांनी पोलिसांच्या मदतीने हा अनधिकृत जुगार अड्डा उध्वस्त केला. (Agriculture Minister Dada Bhuse demolished a gambling den in Malegaon)

गेल्या काही महिन्यांपूर्वी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्वतः भुसे यांनी अशीच एक कारवाई केली होती. या घटनेला काही महिन्याचा काळ लोटला नाही तितक्यात पुन्हा अशीच धडाकेबाज कारवाई भुसे यांनी केली आहे. मग जे भुसे ना दिसते ते मालेगाव तालुका पोलिसांना दिसत नसेल का? असा प्रश्न सर्वसामान्य मालेगावकरांना पडल्या वाचून राहत नाही.

पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

सोमवारी दुपारच्या सुमारास ही धडक कारवाई झाली. याबाबत तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरु असून, त्यानंतर अधिकृत माहिती देण्यात येईल, असे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, कृषिमंत्री भुसे हे सोमवारी झोडगे परिसरात कार्यक्रमानिमित्त गेले होते. तेव्हा त्यांना झोडगे-अस्ताणे रस्त्यावरील मटका जुगार अड्ड्याबद्दल माहिती मिळाली. काही महिन्यांपूर्वीपासून हा क्लब सुरु झाला होता. अल्पावधीत जास्त पैसे कमविण्याच्या आमिषाने अनेक युवक या गैरमार्गाला लागलेत. परिणामी, कौटुंबिक कलहही वाढलेत. या अवैध धंद्याने संसार उद्ध्वस्त होत असताना पोलिस अनभिज्ञ कसे ? असा सवाल उपस्थित झाला. (Agriculture Minister Dada Bhuse demolished a gambling den in Malegaon)

इतर बातम्या

Mumbai Accused Arrest : विरार लोकलमध्ये टॉय गन दाखवून महिलेला लुटणाऱ्या ट्रान्सजेंडरला अटक, बोरीवली जीआरपीची कारवाई

Dombivali Crime : डोंबिवलीत गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा, प्रेमसंबंधातून स्पोर्ट्स कोचकडून विद्यार्थिनीला अमानुष मारहाण

Non Stop LIVE Update
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.