AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनासोबत अनेक नव्या आजारांचा धोका, लग्न सोहळ्यांसह घरगुती कार्यक्रमांमधील गर्दी टाळा : छगन भुजबळ

नागरिकांनी लग्न सोहळे तसेच इतर घरगुती सोहळे करतांना गर्दी करू नये. यांसारख्या कार्यक्रमांमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, अशा सूचना नाशिकच्या पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

कोरोनासोबत अनेक नव्या आजारांचा धोका, लग्न सोहळ्यांसह घरगुती कार्यक्रमांमधील गर्दी टाळा : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal
| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 3:12 PM
Share

नाशिक : नागरिकांनी लग्न सोहळे तसेच इतर घरगुती सोहळे करतांना गर्दी करू नये. यांसारख्या कार्यक्रमांमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असून पोलीस प्रशासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे, जास्त गर्दी होत असेल तर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक स्वामी रिसॉर्ट, लासलगाव येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. (Avoid crowd gathering at family events and wedding ceremonies : Chhagan Bhujbal)

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजनांबाबत आराखडा तयार करण्यात यावा. लसीकरणासाठी अधिक केंद्र वाढविण्याबाबत नियोजन करण्यात यावे. तसेच ऑक्सिजन जनरेशन प्लान्टच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर तातडीने बसविण्यात यावेत. शासकीय रूग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील लसीकरणाच्या अनुषंगाने आवश्यक नवीन लसीकरण केंद्र स्थापन करून केंद्राची संख्या वाढवावी. लसींची उपलब्धता लक्षात घेवून ज्या नागरिकांनी पहिली लस घेतली आहे, त्यांना दुसरी लस देण्याची पूर्तता प्रामुख्याने करण्यात यावी.

लग्न समारंभास परवानगी देताना शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन होणे अधिक गरजेचे असून या ठिकाणी सॅनिटाझर, मास्क व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन होतेय किंवा नाही, यावर पोलीस यंत्रणेने लक्ष ठेवणे व परिस्थिती नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. तालुक्यात व शहरात गृहविलगीकरणात ठेवलेल्या रूग्णांची वेळोवेळी तपासणी करावी. ज्या गृहविलगीकरणात रूग्णांची व्यवस्था पुरेशी नसेल, अशा रूग्णांना तातडीने रूग्णालयात स्थलांतरीत करण्यात यावे, अशा सूचना भुजबळ यांनी यावेळी दिल्या.

कोरोनासह नव्या आजारांमुळे नागरिक त्रस्त

कोरोनासोबत आता म्युकरमायकोसिस, डेल्टा प्लस व लॅमडा या नवीन आजारांचे आगमन होत असताना, प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून स्वत:सोबत आपल्या कुटुंबीयांची काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्हा व तालुक्यातील बाजार समितीने सुध्दा बाजार समितीमध्ये नागरिकांना प्रवेश देतेवेळी योग्य दक्षात घ्यावी. तपासणी केल्याशिवाय बाजार समितीत प्रवेश निषिध्द करावा, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेवून पुढील पाऊल टाकावे

यावेळी पीक परिस्थितीचा आढावा घेताना भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी आगामी पावसाचा अंदाज घेवूनच पेरणी करावी. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येवू नये यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. युरिया व खते यांचा मुबलक साठा उपलब्ध करून ठेवल्यास आगामी काळात त्याचा तुटवडा भासणार नाही, त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी भुजबळ यांनी यावेळी केल्या आहेत.

नेते आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती

लासलगाव येथे पार पडलेल्या बैठकीवेळी लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंच तथा मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ थोरे, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, प्रांताधिकारी सोपान कासार, डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, निवासी वैद्यकीय अधिकारी खैरे, येवला ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, गटविकास अधिकारी संदीप कराड, डॉ. उन्मेष देशमुख, शाखा अभियंता गणेश चौधरी, उपशाखा अभियंता गोसावी, येवला तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या

नाशिक महापालिकेला पहिल्या तिमाहीत आर्थिक फटका, 7 हजार थकबाकीदारांना पालिकेची नोटीस, 400 कोटींची थकबाकी

नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचा काही गुन्हेगारांना ‘मौका’ तर काहींवर ‘मोक्का’, पाहा नेमकं प्रकरण काय?

(Avoid crowd gathering at family events and wedding ceremonies : Chhagan Bhujbal)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.