AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तटकरे- पटेलांविरोधात पुन्हा नाराजीचा सूर, राष्ट्रवादीत मोठा गोंधळ, आता भुजबळ म्हणाले की…

Chhagan Bhujbal Statement: राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह रुपाली ठोंबरे पाटील यांच्या वक्तव्यानंतर चव्हाट्यावर आला. त्यांनी तटकरे आणि पटेलांवर तोंडसुख घेतले. प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार नेमण्यावरून वादंग उठल्याचे समोर येत आहे. या घडामोडींवर भुजबळांची बोलकी प्रतिक्रिया आली आहे.

तटकरे- पटेलांविरोधात पुन्हा नाराजीचा सूर, राष्ट्रवादीत मोठा गोंधळ, आता भुजबळ म्हणाले की...
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ
| Updated on: Aug 08, 2026 | 1:33 PM
Share

राष्ट्रवादीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. अजितदादानंतर पक्षातील वरिष्ठ वर्तुळात नाराजीचा सूर अनेकदा दिसून आला. आता रणनीतीकार प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार नेमण्यावरून वादंग उठले आहे. तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कालपासून काही नेत्यांची खदखद सोशल मीडियावरून समोर आली आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी तर तटकरे आणि पटेलांचं नाव घेऊन पुन्हा आरोपांची राळ उठवली. या सर्व घडामोडींवर मंत्री छगन भुजबळांनी येवला येथे माध्यमांशी बोलताना बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीबाबत मोठे वक्तव्य

प्रशांत किशोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटले. यावेळी खासदार पार्थ पवारही उपस्थित होते. यावर बोलताना  ते भेटले असतील ते कधी आम्हालाही भेटतात. त्याचा अर्थ ते राजकीय सल्लागार होऊन त्यांची नियुक्ती झाली असे मला वाटत नाही, असे मोठे वक्तव्य भुजबळांनी केले. मंत्री आहेत त्यांना येऊन ते भेटले. चर्चा केली तर काय वावगं असे मला काही वाटत नाही, असे ते म्हणाले.

पटेल आणि तटकरे दिल्लीत

प्रफुल पटेल आणि तटकरे तुम्हाला माहिती असेल की दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे. लोकसभेचे आणि राज्यसभेचे त्याच्यामध्ये ते गुंतलेले आहे. त्यामुळे ते मुंबईमध्ये देवगिरी आणि इतर ठिकाणी जाऊ बैठकीत शकले नाही. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या आठवड्यात ते भेटले आणि चर्चा पण कदाचित झाली आहे. फोनवर सुद्धा एखाद्या गोष्टीची चर्चा होते एवढं काही सिरीयस घ्यायचं कारण आहे असं मला वाटत नाही, असे भुजबळ म्हणाले.

सर्वांनी शांततेने घ्यावे

रूपाली ठोंबरे पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. ठीक आहे, सर्वांनी शांततेत घेतले पाहिजे. अजित दादा गेलेले आहेत आणि त्यांच्या पश्चात पक्ष सांभाळायचा आहे. सर्व कार्यकर्त्यांना सांभाळायचे आहे. अधिक ताकद आपण कशी मिळू ते आपल्याला पाहायचे आहे. सावकाशीने सगळ्यांनी घ्यावे असे मला वाटते. दादांच्या कुटुंबियांना त्रास होईल असे वातावरण निर्मिती करण्यात आल्याच्या उमेश पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित दादांवर प्रेम होतं की नव्हतं असे कोणाबद्दल बोलतात हे स्पष्ट नाही. अजित दादांवर प्रेम होते म्हणूनच आम्ही सर्व पवार साहेबांना सोडून इकडे आलेलो होतो हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्या घरात पण मतभेद होतात हा तर पक्ष आहे. आपला हा येवला आहे छोटासा मतदार संघ यामध्ये कितीतरी मतभेद आहे की नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जावे लागते, असे ते म्हणाले.

प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे सल्लागार आहे हे मला माहिती नाही असे तटकरे म्हणाले, त्यावर प्रतिक्रिया देताना ठीक आहे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. शेवटी त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहे. सुनेत्राताई पवार यांना कोणाला भेटायचं कोणाला नाही भेटायचं त्या ठरवतील. आमच्या परवानगीची गरज नाही, असे भुजबळांनी स्पष्ट केले.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?