हजारापेक्षा कमी झालेली रुग्णसंख्या दिलासादायक, ऑक्सिजन प्रकल्पांचे काम प्राधान्याने पूर्ण करा; पालकमंत्री भुजबळांच्या सूचना

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 21, 2021 | 5:19 PM

काही दिवसांपासून स्थिर असलेली उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजारापेक्षा कमी झाल्याने नाशिकमध्ये दिलासादायक परिस्थिती आहे.

हजारापेक्षा कमी झालेली रुग्णसंख्या दिलासादायक, ऑक्सिजन प्रकल्पांचे काम प्राधान्याने पूर्ण करा; पालकमंत्री भुजबळांच्या सूचना

Follow us on

नाशिक : काही दिवसांपासून स्थिर असलेली उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हजारापेक्षा कमी झाल्याने नाशकात दिलासादायक परिस्थिती आहे. ही रुग्णसंख्या अजून कमी होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. (Complete work on oxygen projects as priority; Chhagan Bhujbal orders)

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर लक्षात घेता टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात यावे. त्याचप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात चार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू झाले असून आठ प्रकल्पांच्या टेस्टिंगचे काम सुरू आहे. या ऑक्सिजन प्रकल्पांच्या टेस्टिंगच्या कामात ज्या जबाबदार यंत्रणेकडून दिरंगाई होत असेल त्या संबंधित यंत्रणेवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री भुजबळ यांनी दिले आहेत.

त्याचप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेत करण्यात येणाऱ्या उपायोजनांच्या दृष्टिने बालरुग्णालये तयार करण्यात आली आहेत. म्युकरमायकोसिसच्या एकूण 758 रुग्णांमध्ये घट होवून सध्या 46 रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 632 रुग्ण बरे झाले असून 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लसीकरणात आतापर्यंत 22 लाख 11 हजार 718 लोकांना दोन्ही डोस देण्यात आले असून याचे प्रमाण 30.14 टक्के आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढत असल्याने पालकमंत्री भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.

उपाययोजनांसाठी 56 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता

यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले की, कोरोना काळात कोरोना विषयक उपाययोजनांसाठी आतापर्यंत 56 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या पूर्व तयारीसाठी साधारण एक हजार नवीन बेड्स वाढवण्यात आले असून आजच्या स्थितीला 97 टक्के बेड्स शिल्लक आहेत. महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 100 किलोलिटरचे ऑक्सिजन टँक बसविण्याची प्रक्रीया सुरू आहे. तसेच अजून तीन महिने पुरेल इतका औषधसाठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. आठ ऑक्सिजन प्रकल्पांच्या टेस्टिंगचे सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी बैठकीत पालकमंत्र्यांना सांगितले.

‘चला खेळ खेळूया’ पुस्तकाचे प्रकाशन

बैठकीच्या सुरूवातील जिल्‍हा क्रीडा विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘चला खेळ खेळूया’ या पुस्तकाचे छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

अधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्कर्ष दुधेडिया, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी आदी बैठकीस उपस्थित होते.

इतर बातम्या

राज ठाकरे म्हणतात, राज्यातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी जबाबदार; रोहित पवारांनी पहिल्यांदाच दिलं जोरदार प्रत्युत्तर

राज ठाकरे म्हणतात, राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीवाद फोफावला; प्रविण दरेकरांनी दोनच शब्दात दिलं उत्तर

उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षांच्या बैठकीत सोनिया गांधींना काय सांगितलं?; राऊतांनी केला गौप्यस्फोट!

(Complete work on oxygen projects as priority; Chhagan Bhujbal orders)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI