महाराष्ट्रातील काँग्रेस युवकांना संधी देत नाही; ‘पदवीधर’वरून राजकारणाचा स्तरच ‘या’ नेत्याने सांगितला

आमदार कपिल पाटील यांनी बोलताना राज्यातील काँग्रेस नेतृत्वावरही टीका केली आहे. काँग्रेसच्या  सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे या दोन्ही नेतृत्वार अन्याय झाला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील काँग्रेस युवकांना संधी देत नाही; 'पदवीधर'वरून राजकारणाचा स्तरच 'या' नेत्याने सांगितला
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 10:38 PM

नाशिकः सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांमुळे राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकीकडे हे सुरू असतानाच नाशिकमधील सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे काँग्रेसने तांबे पितापुत्रावर टीका केली आहे तर दुसरीकडे लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे आता काँग्रेसवर कपिल पाटील यांनी टीका केली आहे.

सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यावरून कपिल पाटील यांनी बोलताना सांगितले की, राज्यातील जी थोडीफार अभ्यासू माणसं आहेत. त्यामध्ये डॉ. सुधीर तांबे आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांची नावं फार महत्वाची आहेत. त्यामुळे नव्या युवा नेतृत्वाला आपण संधी दिली पाहिजे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून जे कमावलं आहे ते राज्यातील काँग्रेस नेतृत्वाने गमावू नये असं स्पष्ट मत आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले आहे.

त्यांनी राहुल गांधी यांचा गौरव करताना त्यांनी राज्यातील काँग्रेस नेतृत्वावरही टीका केली आहे. राज्यातील नेतृत्वाने चांगल्या नेतृत्वाना संधी दिली पाहिजे असंही यावेळी त्यांनी सांगितले.

आमदार कपिल पाटील यांनी बोलताना राज्यातील काँग्रेस नेतृत्वावरही टीका केली आहे. काँग्रेसच्या  सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे या दोन्ही नेतृत्वार अन्याय झाला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले.

सत्यजित तांबे यांना या निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा आम्ही देत असून पदवीधर मतदार संघाच्या या निवडणुकीते सत्यजित तांबे हेच विजयी होणार असल्याचा विश्वासही कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.