नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीने 54 हजार 877 हेक्टरवरील पीक मातीमोल, 7 हजार कोंबड्यांचा मृत्यू

जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात नाशिककडे (Nashik) पाठ फिरवलेल्या पावसाने सप्टेंबरमध्ये विनाशक (heavy rains) हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांत नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल 54 हजार 877 हेक्टरवरील पीक मातीमोल (crops damage) झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीने 54 हजार 877 हेक्टरवरील पीक मातीमोल, 7 हजार कोंबड्यांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 1:28 PM

नाशिकः जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात नाशिककडे (Nashik) पाठ फिरवलेल्या पावसाने सप्टेंबरमध्ये विनाशक (heavy rains) हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांत नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल 54 हजार 877 हेक्टरवरील पीक मातीमोल (crops damage) झाले आहे. (Damage to crops on 54 thousand 877 hectares due to heavy rains in Nashik district)

नाशिक जिल्ह्यात नांदगाव आणि मालेगावमध्ये भयानक अतिवृष्टी झाली आहे. पावसामुळे झालेला हाहाकार पाहून कुणाचेही काळीज पिळवटून निघेल इतके नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पीके तर आडवी झालीच आहेत, सोबतच 7 हजार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या असून, १०४ घरांची पडझड झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक पंचनाम्यात उघड झाले आहे. या विनाशकारी पावसाचा तब्बल 152 गावांमधील 69 हजार 269 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पावसाने फळबागा, मका, बाजरी, कापूर, सोयाबीन, भुईमुगाचे अतोनात नुकसान झाले आहे.

कांद्याचे पीक आडवे

नांदगाव-मालेगावमध्ये दोन दिवस झालेल्या पावसाने कांद्याची उभी पिके आडवी झाली आहेत. फळबागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष व डाळिंब बागा उद्धवस्त झाल्या आहेत. अनेक घरांवरील वाऱ्यामुळे पत्रे उडाले आहेत. अनेक घरे पडली आहेत. आता प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून, शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे.

बारा वर्षांत पहिल्यांदा इतका पाऊस

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून ओळखरा जातो. इथे बारा वर्षांत पहिल्यांदा इतका पाऊस पडला आहे. 12 तासांमध्ये 121 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले असून, खरीप हंगाम हातचा गेला आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यानंतर नवरात्र व दिवाळी. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांवर निसर्गाने पुन्हा एकदा वार केला आहे.

नद्यांना आला पूर

नांदगाव आणि मनमाडला परिसरात गेले दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली होती. इथे आतापर्यंत तब्बल 123 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे . शहरातून वाहणाऱ्या लेंडी आणि शाकंभरी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शहरातील सखल भागातील घरे आणि दुकानांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझडही झाली आहे.

धरणे तुडूंब

सध्या जिल्ह्यातील 24 प्रकल्पांत 68 टक्के, गंगापूर समूहात 85 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात 628 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टी झालेल्या नांदगाव व मनमाड तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली आहे. सर्वाधिक 123 मिमी पाऊस एकट्या नांदगाव तालुक्यात नोंदवला असून, जिल्ह्यात आतापर्यंत 76.67 टक्के पाऊस झाला आहे. (Damage to crops on 54 thousand 877 hectares due to heavy rains in Nashik district)

इतर बातम्याः

नांदगाव, मनमाडला पावसाचा तडाखा; लेंडी, शाकंभरीला पूर, पाझर तलाव फुटला

पाझर तलावाचे पाणी शेतात घुसले, दहा एकरांवरील लाखोंचे पीक वाहून गेले

बाजेच्या पायाला ट्यूब बांधून पुरातून काढला मार्ग, पण उपचाराविना मुलीने सोडले प्राण!

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.