ED inquiry | ईडीची नाशिकमध्ये धडक; नवाब मलिकप्रकरणी भंगार व्यावसायिकांची कसून चौकशी

ED inquiry | ईडीची नाशिकमध्ये धडक; नवाब मलिकप्रकरणी भंगार व्यावसायिकांची कसून चौकशी
नाशिकमध्ये नवाब मलिक यांच्याशी संबंधित भंगार व्यावसायिकांची ईडीने चौकशी केल्याचे समोर येत आहे.

एकीकडे ईडीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निकटवर्तीय सतीश उके यांना ताब्यात घेतल्याने महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्री आक्रमक झालेत. तर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या अतिरेकी कारवाया थांबवाव्यात, असे साकडे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले आहे. त्यानंतर नाशिकमध्येही अटकेत असलेले महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकप्रकरणी ईडी पोहचल्याचे समोर आल्याने अनेकांचे धाबे दणाणल्याचे समजते.

मनोज कुलकर्णी

|

Mar 31, 2022 | 2:37 PM

नाशिकः अटकेत असलेले महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याशी संबंधित व्यवहाराशी चौकशी करण्यासाठी ईडीने थेट नाशिकमध्ये धडक मारल्याचे समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक येथे काही भंगार व्यावसायिकांची ईडीने (ED) कसून चौकशी केलीय. त्यामुळे एकच चर्चा सुरूय. मात्र, या प्रकरणी माहिती द्यायला पोलीस आणि प्रशासनाने नकार दिलाय. ईडी अर्थातच अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) गुरुवारी काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर सकाळी छापे मारले. त्यानंतर सतीश उके आणि यांचे भाऊ प्रदीप उके यांना ताब्यात घेतले. यावरून नाना पटोलेंसह महाविकास आघाडीतील इतर नेते आणि मंत्री आक्रमक झालेत. तर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या अतिरेकी कारवाया थांबवाव्यात असे साकडे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले आहे. त्यानंतर नाशिकमध्येही ईडी पोहचल्याचे समोर आल्याने अनेकांचे धाबे दणाणल्याचे समजते.

नेमके प्रकरण काय?

अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अखेर ईडीने अटक केलीय. नवाब मलिकांची अंडरवर्ल्डशी निगडित काही मालमत्ता आहे का, याची चौकशी ईडीकडून सुरू होती. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर ईडीच्या कोठडीत आहे. त्याची चौकशी झाली आहे. या चौकशीत कासकर आणि नवाब मलिक यांच्या कंपनीत जमीन व्यवहार झाल्याचे काही पुरावे ईडीला मिळाल्याचे समजते. याप्रकरणात ईडीने दोन बिल्डरांनाही समन्स पाठवले आहेत. याप्रकरणातच मलिक यांना अटक करण्यात आलीय. मलिक यांचा स्वतःचा भंगारचा व्यवसाय आहे. त्या नाशिकमध्ये व्यवसायाशी निगडित असलेल्या अनेकांची ईडीने चौकशी केल्याचे समजते.

कोठे केली चौकशी?

नाशिकमधील अंबड परिसरात भंगार व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. या ठिकाणी ईडीने अचानक धडक देत अनेक व्यापाऱ्यांची चौकशी केल्याची माहिती समोर आलीय. या व्यापाऱ्यातील अनेकांचा थेट नवाब मलिक यांच्याशी संबंध होता. त्यांच्याशी यांचे व्यवहार सुरू असायचे. त्यामुळे ईडीने येथे येऊन झाडाझडती घेतल्याचे समजते. याप्रकरणी अजूनपर्यंत तरी कोणाला ताब्यात किंवा अटक केल्याचे वृत्त नाही. या विषयावर प्रशासनामधील कोणीही माहिती द्यायला तयार नाही. शिवाय पोलिसांनाही याची खबर नाही. त्यामुळे या चौकशीचे गूढ वाढले आहे.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें