AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रावेर लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, एकनाथ खडसे यांची तातडी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा; पुढे काय?

भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रावेरमधून लढण्यास राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही इच्छुक होते. त्यामुळे या मतदारसंघात सुनेविरुद्ध सासरा अशी निवडणूक होणार असल्याचं चित्र होतं. या पार्श्वभूमीवर नाथाभाऊंनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे.

रावेर लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, एकनाथ खडसे यांची तातडी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा; पुढे काय?
एकनाथ खडसेImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 15, 2024 | 5:44 PM
Share

जळगाव | 15 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर केल्या जाणार आहेत. मात्र त्यापूर्वीच राजकीय पक्षांनी उमेदवार घोषित केले आहेत. भाजपनेही महाराष्ट्रातील 20 जागांसाठीचे उमेदवार घोषित केले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. रक्षा खडसे यांची रावेरमधील ही तिसरी टर्म असणार आहे. याच मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे इच्छुक होते. त्यामुळे या मतदारसंघात सुनेविरुद्ध सासरा असा सामना रंगणार असल्याचं चित्र होतं. मात्र, रक्षा खडसे यांची उमेदवारी घोषित होताच एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे रावेरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.

आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. रावेर लोकसभा मतदार संघात मी किंवा रोहिणी खडसे निवडणूक लढणार नाही. रावेर हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास राष्ट्रवादीतील सहा ते सात जण इच्छुक आहेत. पण मी माझ्या तब्येतीमुळे निवडणूक लढणार नाही, असं एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याचं कालपरवा पर्यंत सांगणाऱ्या नाथाभाऊंनी अचानक यूटर्न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सामना चुरशीचा होणार

मात्र, रावेरचा सामना चुरशीचा होणार असल्याचा दावा नाथाभाऊंनी केला आहे. उद्या रावेरचा सामना चुरशीचा होईल. आमचाच उमेदवार विजयी होईल, असं सांगतानाच गिरीश महाजन यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधिल नाही, असं नाथाभाऊ म्हणाले. तसेच महायुतीच्या बाजूने निवडणूक सर्वे आहे असा कोण बोलतंय? अनेक सर्वे हे महाविकास आघाडीच्या बाजूने देखील आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

प्रकरण न्यायप्रविष्ट आहे

आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरही बोलण्यास त्यांनी नकार दिला. ही गोष्ट न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही, असं सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

तब्येत खूप खालावली होती

दरम्यान, रोहिणी खडसे यांनीही मीडियाशी संवाद साधला. आमच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांची आज पवार साहेबांनी बैठक घेतली. रावेरमधून कोणता उमेदवार द्यायचा यावर लवकरच निर्णय होईल. प्रत्येकाची लढायची तयारी असते. मी विधानसभेची तयारी करत आहेत. कोणत्या निवडणुकीत कुणाला उभं करायचं हे पक्ष ठरवत असतो. तुम्हाला प्रत्येकाला एकनाथ खडसे यांच्या तब्येतीची माहिती आहेच. ते खूप आजारी होते. त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळेच ते लढण्यास इच्छुक नाहीत, असं रोहिणी खडसे म्हणाल्या.

Follow Us
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही