एक रुपया जरी खाल्ला तर तुमचा जोडा आणि आमचं डोकं; गिरीश महाजन असं का म्हणाले?

मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. दूध संघाच्या बैठकीच्या निमित्ताने गिरीश महाजन यांनी ही टीका केली आहे. त्यामुळे त्यावर नाथाभाऊ काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एक रुपया जरी खाल्ला तर तुमचा जोडा आणि आमचं डोकं; गिरीश महाजन असं का म्हणाले?
eknath khadseImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 8:08 AM

जळगाव | 25 सप्टेंबर 2023 : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील वाद काही थांबताना दिसत नाही. संधी मिळताच हे दोन्ही नेते एकमेकांवर वार प्रहार करत असतात. आता जिल्हा दूध संघाच्या बैठकीवरूनही गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. जिल्हा दूध संघात आम्ही प्रामाणिकपणे काम करू. या ठिकाणी भ्रष्टाचार होणार नाही. आम्ही एक रुपया जरी खाल्ला तर तुमचा जोडा आणि आमचं डोकं असेल, असं गिरीश महाजन म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

जिल्हा दूध संघाची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना पारदर्शक कारभाराची हमी दिली. तसेच जिल्हा दूध संघाची पुढची वाटचाल कशी असेल याबाबतचं मार्गदर्शनही केलं. जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्याला पूरक व्यवसाय हा निर्माण व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनाही सुगीचे दिवस यावे यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकष्ठा करणार आहोत.

अगदी प्रामाणिकपणाने आम्ही काम करू. हे करत असताना आम्ही तुमचे लाख रुपये, शंभर रुपयेच काय पण एक रुपया जरी खाल्ला तर तुमच्या पायातला जोडा आहे आणि आमचं डोकं आहे, असं गिरीश महाजन म्हणाले. आम्ही पारदर्शक कारभार करणारच असंही त्यांनी ठासून सांगितलं.

महाजन यांची टोलेबाजी

आम्हाला कुठे गाडीच्या डिक्कित टाकून घरी बटर न्यायचं नाही. तूप भरून न्यायचे नाही. जिल्हा दूध संघाची गाडी वापरायची नाही. ड्रायव्हर वापरायचा नाही, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर हल्ला चढवला. खडसेंच्या संचालक मंडळात झालेल्या गैर व्यव्यहरावर भाष्य करत आणि खडसे यांचं नाव न घेता महाजन यांनी टोलेबाजी केली.

दूध, लोणी विकायचे नाही

घरी दूध, लोणी, तूप नेऊन विकण्यासाठी आम्ही दूध संघात आलो नाही. असले प्रकार करून आम्हाला आमच्या घरातील लोकांचे पगार वाढवायचे नाहीत. आम्हाला फक्त शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनीही आपल्या दूध संघाचं नाव काढलं पाहिजे, असं काम आम्हाला करायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

निवडणूक लढवून दाखवाच

उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याचे वक्तव्य खडसे यांनी केलं होतं. खडसे यांच्या वक्तव्याचाही महाजन यांनी समाचार घेतला. खडसे यांनी बोलण्याऐवजी स्वतः निवडणूक रिंगणात उतरावे, असे आव्हानच महाजन यांनी दिलं आहे. निवडणुकीत कोण किती प्रभावी आहे हे ठरेल. लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी, असं सांगतानाच खडसे यांनी ज्या ठिकाणी आनंद मिळत आहे, त्या ठिकाणी आनंद घ्यावा, असा टोला त्यांनी लगावला.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.