कुटुंबाचं लसीकरण त्याला करात सूट, ज्यांचं नाही त्याला गावात फिरण्यास बंदी, सुकेणे ग्रामपंचायतीचा डॅशिंग निर्णय

कोरोना प्रतिबंधक लस जर घेतली नाही तर गावात फिरु देणार नाही, असा डॅशिंग निर्णय निफाड तालुक्यातील कसबे सुकाणे या ग्रामपंचायतीने घेतला आहे. निफाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्या कारणाने लसीकरण गरजेचे आहे.

कुटुंबाचं लसीकरण त्याला करात सूट, ज्यांचं नाही त्याला गावात फिरण्यास बंदी, सुकेणे ग्रामपंचायतीचा डॅशिंग निर्णय
Niphad Kasabe Sukene Gram Panchayat

नाशिक : कोरोना प्रतिबंधक लस जर घेतली नाही तर गावात फिरु देणार नाही, असा डॅशिंग निर्णय निफाड तालुक्यातील कसबे सुकाणे या ग्रामपंचायतीने घेतला आहे. निफाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्या कारणाने लसीकरण गरजेचे आहे. याकरता कसबे सुकेणे या ग्रामपंचायतीने डॅशिंग निर्णय घेतलाय.

लस नाही तर गावात फिरु देणार नाही!

कसबे सुकेणे या ग्रामपंचायतीने डॅशिंग निर्णय घेताना स्पष्टीकरण दिलंय, गावातील जे ग्रामस्थ लस घेणार नाही, त्यांना गावात फिरु दिले जाणार नाही तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकाचे सुद्धा लसीकरण अनिवार्य असल्याचे ग्रामपंचायतीने सांगितलं आहे.

कुटुंबातील सर्वांचं लसीकरण, त्यांना पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या व्याजात व दंडामध्ये सूट

गावातील जे नागरिक लस घेणार नाही त्यांना गावात फिरु देले जाणार नसून गावातील ज्या कुटुंबाने आपल्या घरातील सर्व सदस्यांचे लसीकरण केलेले असेल अशा कुटुंबांना पाणीपट्टी व घरपट्टीच्या व्याजात व दंडामध्ये सूट देण्यात येणार आहे, असा खास निर्णयही देखील कसबे सुकेणे या ग्रामपंचायतीने घेतला आहे.

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी असा स्तुत्य निर्णय घ्यावा!

ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असून लोकांनी लसीकरण करून घ्यावे जेणेकरून आपल्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. ग्रामपंचायतीने लसीबाबत जो निर्णय घेतला आहे असाच निर्णय महाराष्ट्रातील सर्वत्र घेण्यात आला तर नक्कीच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन कोरोना हद्दपार होऊ शकतो, अशा प्रतिक्रिया लोकांमधून येत आहेत.

(If you dont get vaccinated, you wont be allowed to roam in the village Dashing Decision of Nashik Niphad Kasabe Sukene Gram Panchayat)

हे ही वाचा :

धक्कादायक! शेतवस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ, सामुहिक बलात्कार, औरंगाबाद जिल्ह्यातील तोंडाळीतील घटना

भिवंडीत कॉलेजमध्ये पाऊल ठेवताच विद्यार्थ्यांना लस टोचल्या; महापालिकेची लसीकरण मोहीम जोरात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI