ओ मेरे सोना रे सोना रे सोना…नाशिकमध्ये 24 कॅरेट सोने 46900 वर!

नाशिकच्या सराफा बाजार पेठेमध्ये (Nashik) गुरुवारी (16 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर 10 ग्रॅममागे 46900, तर चांदीचे (Silver) दर किलोमागे 63000 रुपये नोंदवले गेले.

ओ मेरे सोना रे सोना रे सोना...नाशिकमध्ये 24 कॅरेट सोने 46900 वर!
सोने स्थिर.

नाशिकः नाशिकच्या सराफा बाजार पेठेमध्ये (Nashik) गुरुवारी (16 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर 10 ग्रॅममागे 46900, तर चांदीचे (Silver) दर किलोमागे 63000 रुपये नोंदवले गेले. (In Nashik bullion market, the price of 24 carat gold is Rs 46,900 per 10 grams)

नाशिकच्या सराफा बाजार पेठेमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सराफा बाजारातील दर स्थिर आहेत. मंगळवारी (14 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम मागचे दर 47500 होते. मात्र, त्यात बुधवारी (15 सप्टेंबर) 150 रुपयांची वाढ होऊन ते 47650 वर स्थिरावले. 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर मंगळवारी 45000 रुपयांवर गेले होते. बुधवारी या दरात कसलाही बदल झाला नाही. मात्र, गुरुवारी गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचेदर 10 ग्रॅममागे 46900, तर चांदीचे दर किलोमागे 63000 रुपये नोंदवले गेले. यात तीन टक्के जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचेदर 10 ग्रॅममागे 48300 रुपये आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीविना 10 ग्रॅममागे 45400 आहेत. तसेच तीन टक्के जीएसटीसह 46700 रुपये आहेत. दरम्यान, आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोने

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

दरात सुरू आहे घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सध्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 2.1 टक्क्यांची घसरण होऊन सोन्याचा भाव प्रतिऔंस 1,787.40 डॉलर्सवर स्थिरावला होता. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या भावात सोमवारी किंचित वाढ नोंदवण्यात आली असली तरी सोन्याने सध्या गेल्या महिनाभरातील निचांकी स्तर गाठला होता.

नाशिकच्या सराफा बाजारात गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात खूप मोठी चढ-उतार नोंदविली गेली नाही. 24 कॅरेट सोन्याचेदर 10 ग्रॅममागे 46900, तर चांदीचे दर किलोमागे 63000 रुपये नोंदवले गेले. यात तीन टक्के जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचेदर 10 ग्रॅममागे 48300 रुपये आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीविना 10 ग्रॅममागे 45400 आणि तीन जीएसटीसह 46700 रुपये आहेत.
– गिरीश नेवासे, अध्यक्ष, सराफा असोसिएशन, नाशिक (In Nashik bullion market, the price of 24 carat gold is Rs 46,900 per 10 grams)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये प्रवेशाच्या नावाखाली 125 विद्यार्थिनींना कॉलेजचा गंडा, वर्षही जाणार वाया

चर्चा तर होणारचः नाशिकमध्ये रस्ता दुरुस्तीसाठी व्यवस्थापकाची यथासांग पूजा अन् आरती!

नाशिकसह आठ आदिवासी जिल्ह्यांमध्ये पद भरती आरक्षण होणार लागू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI