वऱ्हाडी मंडळीची गाडी गोदावरी नदीपात्रात कोसळली, 2 ठार 8 जखमी, तरुणाच्या प्रसंगावधानामुळे 15 बचावले

सिन्नर येथून विवाह सोहळा आटपून वऱ्हाडी मंडळींना घेऊन येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथे आपल्या मूळ गावी परतणाऱ्या पिकअप गाडीचा अपघात झाला.

वऱ्हाडी मंडळीची गाडी गोदावरी नदीपात्रात कोसळली, 2 ठार 8 जखमी, तरुणाच्या प्रसंगावधानामुळे 15 बचावले
निफाडमध्ये पिकअप नदीत कोसळली
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 7:18 PM

नाशिक: सिन्नर येथून विवाह सोहळा आटपून वऱ्हाडी मंडळींना घेऊन येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथे आपल्या मूळ गावी परतणाऱ्या पिकअप गाडीचा अपघात झाला. नांदूर मधमेश्वर गावाजवळ असलेल्या गोदावरी नदीच्या पत्रावरील पुलावरुन जात असताना तवेरा गाडीनं कट मारल्यानं चालकाचे पिकअप गाडीवरील नियंत्रण सुटले. पिकअप गाड़ी नदीत खाली कोसळल्याने या गाडीतील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

दोन ठार आठ जखमी

पिक अप गोदावरी नदीपात्रात कोसळल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर निफाड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

तरुणाच्या प्रसंगावधनामुळे 15 जण बचावले

पिकअप गाडी नदी पात्रात कोसळली त्यावेळी जवळच मासेमारी करत असलेले विशाल मोरे यांनी यांनी नदीत उडी घेत 15 जणांचे प्राण वाचवले. या घटनेत जखमी झालेल्यांना निफाडच्या उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नदीत पडलेली पिकअप गाड़ी क्रेन च्या साह्याने ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली आहे.

दोघांचा मृत्यू तर 8 जण जखमी

पिकअप जीप नदीत कोसळ्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. चिमुकली सई विकास देवकर , मधुकर घुले ही मृत झालेल्या दोघांची नावं आहेत.

निफाडमध्ये घडली दुर्मिळ घटना , एकाच वेळी दोन बिबटे जेरबंद

कादवा नदी काठवार असलेल्या निफाड़ तालुक्यातील वडाळी नजिक गावात उसाचे मोठे क्षेत्र असल्याने येथे बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बिबट्यांकडून मोकाट जनावरांसह माणसांवर हल्ले होत असल्याने येथील शेतकरी रोहन होळकर यांनी निफाड येथील वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने रोहन होळकर यांच्या उसाच्या शेतात लावलेल्या पिंजर्‍यात एक नाही तर चक्क दोन बिबटे एकाच वेळी जेरबंद झाल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. हे बिबटे अंदाजे दीड ते पावणे दोन वर्षाचे असून दोन्ही बिबटे मादी जातीचे आहेत. या दोन्ही बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडून तपासणी केल्यानंतर या दोन्ही बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडे करण्यात आली आहे. या परिसरातील इतर बिबटे असल्याने वन विभागाने यांनाही जेरबंद करून संपूर्ण गावे बिबटेमुक्त परिसर करावे अशी मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.

इतर बातम्या:

तिसरी लाट रोखण्यासाठी खासगी रुग्णालयातील 200 जणांना प्रशिक्षण; ठाणे महापालिका लागली कामाला

शेतकऱ्यांना डाळींचा हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, पाशा पटेल यांचं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना साकडं

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.