Malegoan blast : हा निकाल मान्य नाही, आम्ही सुप्रीम कोर्टात न्याय मागणार, शेख लियाकत मोईउद्दीन यांच्या वेदना काय?
Malegaon blast : 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व कथित आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. आता त्यावरून मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडितांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातील अनेक जण आता या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.

Sheikh Liaquat Mohiuddin : 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व कथित आरोपींची आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडितांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातील अनेक जणांनी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. आज मुंबईत विशेष न्यायालयाने या खटल्याचा निकाल जाहीर केला.
सुप्रीम कोर्टात दाद मागणार
29 सप्टेंबर 2008 रोजी हा स्फोट झाला होता. भिक्खू चौकात हा स्फोट झाला होता. अभिनव भारतचे नाव या स्फोटाने समोर आले होते. त्यानंतर गेल्या 17 वर्षात या खटल्याने अनेक वळणं पाहिली. आज या खटल्याचा निकाल लागला. त्यात सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. त्यावर पीडितांनी नाराजी व्यक्त केली.
या स्फोटात शेख लियाकत मोईउद्दीन यांनी त्यांची मुलगी गमावली होती. त्यांनी माझी मुलगी वडापाव आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. नंतर कळालं तिचा देखील ब्लास्ट मध्ये मृत्यू झाला. आजचा विशेष न्यायालयाचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही. खूप चुकीचा निर्णया झाला आहे. हेमंत करकरे यांनी अत्यंत सखोल तपास केला. अनेक पुरावे देखील सादर केले. तरी देखील निर्दोष मुक्तता झाली. आम्ही या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत.
न्यायालयावर नाराज नाही, दाद मागणार
इमानदार अधिकारी हेमंत करकरे यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला होता. पण असा निकाल अपेक्षित नव्हते. आम्ही न्यायालयावर नाराज नाही. जे पुरावे आणि सुरक्षा यंत्रणांनी मांडले, त्याआधारे एनआयए कोर्टाने निकाल दिला. आम्ही याच पुराव्यांआधारे या निकालाविरोधात वरिष्ठ कोर्टात दाद मागू. हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे एका पीडिताने मालेगावात सांगितले.
पुराव्या अभावी 7 आरोपींची मुक्तता
मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी पुराव्यांअभावी एनआयएच्या विशेष न्यायालयाने 7 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या कोर्टाने याप्रकरणात निकाल दिला. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, यांच्यासह 7 जणांवर याप्रकरणी आरोप लावण्यात आले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
