AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray | कोणाची इतकी हिम्मत? नाशिकमध्ये कोणी फाडले राज ठाकरेंचे बॅनर?

Raj Thackeray | नाशिक हा मनसेचा गड मानला जातो. त्याच नाशिकमध्ये कोणीतरी राज ठाकरे यांचे बॅनर फाडले. राज ठाकरे इथे येण्याआधी हा सर्व प्रकार घडलाय. मनसैनिकांकडून याचे संतप्त पडसाद उमटू शकतात. नाशिक शहराने अनेकदा मनेसची आक्रमक आंदोलन अनुभवली आहेत.

Raj Thackeray | कोणाची इतकी हिम्मत? नाशिकमध्ये कोणी फाडले राज ठाकरेंचे बॅनर?
Banner torn
| Updated on: Mar 07, 2024 | 10:52 AM
Share

Raj Thackeray (चंदन पूजाधिकारी) | एकवेळ नाशिक हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला होता. नाशिकच्या तरुणाईमध्ये राज ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड क्रेझ होती. बदलत्या वेळेनुसार, ही क्रेझ थोडी कमी झाली असली, तरी संपलेली नाही. नाशिकमध्ये राज ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. 2009 मध्ये मनसेचे 13 आमदार निवडून आले. त्यातले तीन आमदार नाशिक शहराने दिले होते. नाशिकमध्ये राज ठाकरे यांचा एक दबदबा होता. हा दबदबा थोडा कमी झाला असला, तरी अजूनही त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते. राज ठाकरे यांचा नाशिक शहरावर सुद्धा तितकच प्रेम आहे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर याच शहरातून राज ठाकरे यांना भक्कम जनाधार मिळाला होता. त्याच नाशिकमध्ये आज राज ठाकरे यांचे बॅनर फाडण्याची घटना घडली आहे.

राज ठाकरे यांचे लावलेले बॅनर फाडण्यात आले. काळाराम मंदिर परिसरात हे बॅनर लावण्यात आले होते. उद्या राज ठाकरे काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. तत्पूर्वी काही अज्ञातांनी रात्रीच राज ठाकरे यांचे हे बॅनर्स फाडले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. काळाराम मंदिरात राज ठाकरे दर्शन घेणार आहेत. यंदा मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार आहे. त्या निमित्ताने राज ठाकरे तीन दिवस नाशिकमध्ये आहेत. राज ठाकरे यांच्यासह मनसेचे अनेक नेते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.

लोकसभेसाठी मनसेचा कुठल्या भागावर फोकस?

राज ठाकरे रविवारी पुण्यात गेले होते. त्यावेळी बैठकीसाठी पदाधिकारी वेळेवर पोहोचले नाहीत, म्हणून राज ठाकर तडक तिथून निघून मुंबईला आले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मनसेकडून मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. पुणे, नाशिक आणि मुंबई या भागांवर मनसेचा विशेष फोकस आहे. लोकसभेची निवडणूक लढवताना विधानसभेची मोर्चेंबांधणी हा मुख्य उद्देश आहे. शहरी भागात मनसेचा जनाधार आहे. फक्त आता तो मतपेटीत परावर्तित होणं गरजेच आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!