Nashik | येवल्यातल्या क्रीडा संकुलासाठी 3 कोटींचा निधी; मंत्री छगन भुजबळांची घोषणा

Nashik | येवल्यातल्या क्रीडा संकुलासाठी 3 कोटींचा निधी; मंत्री छगन भुजबळांची घोषणा
येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनामुळे गेली दोन वर्षे विविध उपक्रम साजरे झाले नाहीत. आता निर्बंध उठविण्यात आल्याने सर्व उपक्रम सण उत्सव पुन्हा उत्साहात साजरे होत आहेत याचा आनंद आहे. यापुढील काळात पुन्हा अशी वेळ येणार नाही. यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.

उमेश पारीक

| Edited By: मनोज कुलकर्णी

Mar 29, 2022 | 11:16 AM

येवलाः येवला क्रीडा संकुलाच्या नूतनीकरणास तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून, लवकरच या संकुलाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. येवल्यातील क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेळ पुन्हा सुरू होऊन खेळाडू घडले पाहिजेत. तसेच सर्वच क्षेत्रात येवला पुढे असले पाहिजे, असा आपला नेहमीच प्रयत्न असतो, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक (Nashik) जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. मंत्री भुजबळ यांनी स्वामी मुक्तानंद विद्यालय पटांगण, येवला (Yeola) येथे शिंदे पाटील फाउंडेशन आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेस उपस्थिती लावली. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला तहसीलदार प्रमोद हिले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, गणेश शिंदे, प्रवीण बनकर, राजेश भांडगे, दीपक लोणारी, सचिन कळमकर, क्रीडा स्पर्धेचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, सचिव सुनील शिंदे, सदस्य राजेंद्र बाकळे, प्रशांत शिनकर, सुशांत हजारे, दीपक गुप्ता, दीपक घिगे, पप्पू वाणी यांच्यासह सुनील पैठणकर, सुभाष गांगुर्डे, भाऊसाहेब धनवटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टीमवर्कमुळे येवल्याचा विकास

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनामुळे गेली दोन वर्षे विविध उपक्रम साजरे झाले नाहीत. आता निर्बंध उठविण्यात आल्याने सर्व उपक्रम सण उत्सव पुन्हा उत्साहात साजरे होत आहेत याचा आनंद आहे. यापुढील काळात पुन्हा अशी वेळ येणार नाही. यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. टीम वर्कच्या माध्यमातून नेहमीच चांगले काम होत असते. येवल्यातही आपले टीमवर्क असल्याने येवल्याचा विकास होत असून यापुढील काळातही विकासाची कामे होतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी सांगितले.

खेळाला वयाचे बंधन नाही

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, खेळाला वयाचे बंधन नाही. आपल्या या स्पर्धेत विविध क्षेत्रातील काम करणारे लोक सहभागी झालेले आहेत. खेळाडूंना यातून व्यासपीठ मिळणार आहे. आज ग्रामीण भागातील खेळाडूंना आयपीएल सारख्या स्पर्धांमधून संधी मिळाली असून, अनेक खेळाडू नावारूपाला येत असल्याचे त्यांनी सांगितले. विविध प्रकारच्या स्पर्धा नेहमीच भरविल्या जाव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

येवला क्रीडा संकुलाच्या नूतनीकरणास तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून, लवकरच या संकुलाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. येवल्यातील क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेळ पुन्हा सुरू होऊन खेळाडू घडले पाहिजेत. तसेच सर्वच क्षेत्रात येवला पुढे असले पाहिजे, असा आपला नेहमीच प्रयत्न असतो.
– छगन भुजबळ, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें