पोटतिडकीने काम करुनही मानधन अपुरं का? आशा कार्यकर्त्यांचं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

"आशा कर्मचारी इतकं पोटतिडकीने काम करत असताना ही त्यांना पुरेसं मानधन मिळत नाही, मिळतं ते ही तोकडंच. ते ही वेळेवर नाही. त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांनी काम कसं करायचं?" असा सवाल आशा कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.

पोटतिडकीने काम करुनही मानधन अपुरं का? आशा कार्यकर्त्यांचं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा वर्करचं आंदोलन
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 1:46 PM

नाशिक : थकित मानधनाच्या निषेधार्थ आशा गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. लवकरात लवकर थकित मानधन तरी मिळावं, अशी जोरदार मागणी ही या वेळी करण्यात आली.

आशा कर्मचाऱ्यांची मागणी काय?

“आशा कर्मचारी इतकं पोटतिडकीने काम करत असताना ही त्यांना पुरेसं मानधन मिळत नाही, मिळतं ते ही तोकडंच. ते ही वेळेवर नाही. त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांनी काम कसं करायचं?” असा सवाल आशा कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकार, आणि राज्य सरकार यांच्या विरोधात त्यांनी यावेळी आपला संताप व्यक्त करण्यात आला.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं

आशा गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रविवारी सकाळी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. आपलं थकित मानधन तरी लवकरात लवकर मिळावं, अशी विनंती ही यावेळी करण्यात आली.

भरीव मानधन वाढवण्याचा आग्रह

दरम्यान, आशा आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या  बेमुदत संप प्रकरणी तोडगा काढण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जुलै महिन्यात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात कामगार संघटनांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्य सरकारतर्फे आशा व गटप्रवर्तक यांना दरमहा एक हजार रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव सरकारतर्फे देण्यात आला होता. महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने हा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगत फेटाळला आणि भरीव वाढ देण्याचा आग्रह धरला होता.

खाद्य विक्रेत्यांकडून पोलिसांचा निषेध

दुसरीकडे, लोहमार्ग पोलीस, इगतपुरी आणि इगतपुरी रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या मध्य रेल्वेच्या अधिकृत वेंडर (खाद्य विक्रेते) यामधील वाद चव्हाट्यावर आला आहे. लोहमार्ग पोलिसांच्या विनाकारण कारवाईच्या निषेधार्थ रेल्वे स्थानकातील सुमारे 200 वेंडर यांनी आज इगतपुरी रेल्वे स्थानकातील सर्व खाद्य पदार्थ विक्री बंद करुन लोहमार्ग पोलिसांचा निषेध केला आहे. यामुळे स्थानकात आलेल्या एकाही प्रवाशाला खाद्य पदार्थ मिळालेल नाहीत. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

पोलिसांनी नाहक त्रास दिल्याचा आरोप

गेल्या 10 दिवसांत लोहमार्ग पोलिसांनी नाशिकमधील इगतपुरी रेल्वे स्थानकावर 35 वेंडरवर बेकायदेशीर दंडात्मक कार्यवाही केली. ही कारवाई अयोग्य असून पोलिस आम्हाला नाहक त्रास देत असल्याचा आरोप खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी केला आहे. दरम्यान, सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्थानकावरील सर्व मुख्य पाच कँटीन बंद ठेवण्यात आले. कँटीन मालक आणि वेंडर यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली.

दरम्यान, इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक सोपान भाईक यांनी केलेल्या कार्यवाहीचे समर्थन केले असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कार्यवाही योग्य असून कायद्याच्या तरतुदीनुसार केली असल्याचे सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

आशा आणि गटप्रवर्तक कर्मचार्‍यांची आरोग्यमंत्र्यांसोबतची बोलणी फिसकटली, बेमुदत संप सुरूच राहणार

ओबीसींची लढाई लढणाऱ्यांना त्रास दिला जातोय; पण घाबरून चालणार नाही: छगन भुजबळ

‘पाणी’ डोक्यावरुन चाललंय, पाणीपट्टी थकवणाऱ्यांचं नळ कनेक्शन तोडणार, नाशिक पालिकेचा निर्णय

इगतपुरी रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्री बंद, कारवाईविरोधात विक्रेत्यांकडून पोलिसांचा निषेध

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.