AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Rain : नाशिक शहरात जुलै महिन्यात 550.6 मिमी पावसाची नोंद, 81 वर्षांचा विक्रम यंदा मोडीत…

नाशिक जिल्हात सुरू असलेल्या दमदार पावसाने जिल्हातील सर्वच नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान देखील झाले आहे. 25 दिवसांत शहरात दमदार पाऊस झाल्याने 81 वर्षांचा विक्रम मोडीस निघाला आहे.

Nashik Rain : नाशिक शहरात जुलै महिन्यात 550.6 मिमी पावसाची नोंद, 81 वर्षांचा विक्रम यंदा मोडीत...
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 26, 2022 | 9:24 AM
Share

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्हात जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, जुलै महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने धरण ओव्हर फ्लो झाली आहेत. नाशिक शहरात जुलै महिन्यात विक्रमी पाऊस (Rain) झालायं. 81 वर्षांचा विक्रम यंदा पावसाने मोडला आहे. 1941 साली जुलै अखेर 549.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. हा विक्रम मोडीत निघाला असून या वर्षी आतापर्यंत 550.6 मिमी पावसाची नव्याने नोंद झालीयं. 8 जुलै, 9 जुलै, 11 जुलै, 12 जुलै या दिवशी शहरात (City) दमदार पावसाची नोंद झाली असून तब्बल 1941 नंतर यंदा 549.5 मिमी झालायं.

25 दिवसात शहरात दमदार पाऊस झाल्याने 81 वर्षांचा विक्रम मोडीस

नाशिक जिल्हात सुरू असलेल्या दमदार पावसाने जिल्हातील सर्वच नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान देखील झाले आहे. 25 दिवसांत शहरात दमदार पाऊस झाल्याने 81 वर्षांचा विक्रम मोडीस निघाला आहे. नाशिक जिल्हात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरूच आहे. यामुळे पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देऊन पुराच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन देखील केले आहे.

जिल्ह्यातील धरणे फुल्ल झाल्याने नद्यांना देखील पूर

जिल्ह्यातील धरणे फुल्ल झाल्याने नद्यांना देखील पूर आलायं. गोदावरी दारणा संगमाचे दृश्य तर पाहण्यासारखेच आहे. यंदाच्या पावसामुळे नाशिककरांसोबतच मराठवाड्याचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे. इकडे जायकवाडी धरणाचे पाणी पातळी 92 टक्कावर आले असून जायकवाडी धरणाचे दरवाजे आणखी अर्ध्या फुटाणे उचलणार आहेत. आणखी 9000 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. जायकवाडी धरणातून एकूण 20000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. नाशिकमध्ये दमदार पाऊस झाल्याने यंदाचे पाण्याचे टेन्शन मिटणार हे नक्की आहे.

Follow Us
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!
महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
Mahayuti Meeting Update : महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर...
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांचे मोठे विधान