Nashik Corona : नाशिकमध्ये कोरोना बळींचे गौडबंगाल, मृत्यू 4105, पण सानुग्रह अनुदानासाठी 8338 अर्ज मंजूर

नाशिकः नाशिककरांच्या (Nashik) मानगुटीवर बसलेले कोरोनाचे (Corona) भूत काही केल्या उतरायला तयार नाही. गेल्या दोन लाटांच्या प्रकोपांनी शहरवासीयांना हादरवून सोडले. त्यातही आरोग्य व्यवस्थेचा कमकुवतपणा समोर आला. ऑक्सिजन (Oxygen) सिलिंडर, इंजेक्शनसाठी दिवस-दिवस रांगा लावाव्या लागल्या. आता त्याच नाशिकमध्ये कोरोना बळींच्या गौडबंगालाने पुन्हा एकदा उचल खाल्लीय. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे 4105 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. […]

Nashik Corona : नाशिकमध्ये कोरोना बळींचे गौडबंगाल, मृत्यू 4105, पण सानुग्रह अनुदानासाठी 8338 अर्ज मंजूर
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 3:06 PM

नाशिकः नाशिककरांच्या (Nashik) मानगुटीवर बसलेले कोरोनाचे (Corona) भूत काही केल्या उतरायला तयार नाही. गेल्या दोन लाटांच्या प्रकोपांनी शहरवासीयांना हादरवून सोडले. त्यातही आरोग्य व्यवस्थेचा कमकुवतपणा समोर आला. ऑक्सिजन (Oxygen) सिलिंडर, इंजेक्शनसाठी दिवस-दिवस रांगा लावाव्या लागल्या. आता त्याच नाशिकमध्ये कोरोना बळींच्या गौडबंगालाने पुन्हा एकदा उचल खाल्लीय. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे 4105 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, कोरोना बळींच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानसाठी तब्बल 10 हजार 120 अर्ज प्राप्त झालेत. विशेष म्हणजे यातील 8 हजार 338 अर्ज वैद्यकीय विभागाने मंजूर केले आहेत. त्यामुळे आता सरकार दरबारच्या आकडीवारीनुसार येथील कोरोना बळींचा आकडा चक्क दुपटीवर म्हणजेच 8 हजार 338 वर जाऊन ठेपलाय. आता या मृत्यूमागील कारणांचा शोध वैद्यकीय विभागाने सुरू केल्याचे समजते.

काय आहे अनुदान?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केले आहे. त्याअनुषंगाने अर्ज मागवण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव यांच्या 12 ऑक्टोबर 2021 रोजीच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रुपये 50 हजार सानुग्रह अनुदान वितरित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे 4105 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर सानुग्रह अनुदानसाठी तब्बल 10 हजार 120 अर्ज प्राप्त झालेत. त्यातील 8 हजार 338 अर्ज वैद्यकीय विभागाने मंजूर केले आहेत. आता ही वाढलेली मृत्यू संख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरतेय.

अर्जांची होणार चौकशी

कोरोनाच्या सानुग्रह अनुदानासाठी आलेल्या अर्जाची संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या अर्जांची चौकशी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. प्रशासनाने ऑनलाइन अर्ज मागवले होते. काही अर्ज ऑफलाइन आल्याचीही शक्यता आहे. शिवाय एकाच घरातील अनेक जणांनी अर्ज केले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या कारणामुळे या साऱ्या अर्जांची बारकाईने चौकशी केली जाणार आहे. तरीही चक्क दुपटीवर दुबार अर्ज कसे काय असू शकतील, असा प्रश्नही विचारला जातोय. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाने कोरोनाच्या बळींची संख्या दडवली काय, असा प्रश्न चर्चेत आला आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.