AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये कारसाठी विवाहितेचा छळ; मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, पती सैन्य दलात

नाशिकमधल्या (Nashik) काजीसांगवी (ता. चांदडव) येथे कार घेण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याची घटना घडली. त्यानंतर या विवाहितेचा मृतदेह चांदवडच्या एका विहिरीत आढळून आला. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आपल्या लेकीचा खून केला. मृतदेह विहिरीत फेकला, असा आरोप मृत मुलीच्या कुटुंबाने केला आहे.

नाशिकमध्ये कारसाठी विवाहितेचा छळ; मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, पती सैन्य दलात
प्रातिनिधिक छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Apr 25, 2022 | 3:45 PM
Share

नाशिकः नाशिकमधल्या (Nashik) काजीसांगवी (ता. चांदडव) येथे कार घेण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याची घटना घडली. त्यानंतर या विवाहितेचा मृतदेह चांदवडच्या एका विहिरीत आढळून आला. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आपल्या लेकीचा खून केला. मृतदेह विहिरीत फेकला, असा आरोप मृत मुलीच्या कुटुंबाने केला आहे. अश्विनी ठाकरे असे त्या विवाहितेचे नाव असून, याप्रकरणी नवरा,सासू, सासरे आणि 2 नणंदच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अश्विनीचा पती हा सैन्य दलात आहे. या प्रकरणी विवाहितेचे वडील रामदास एकनाथ सरोदे (रा. नांदुरखुर्द ता. निफाड) यांनी चांदवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांची मुलगी अश्विनी हिचे लग्न 15 फेब्रुवारी 2021 रोजी काजीसांगवी येथील सचिन दिलीप ठाकरेशी झाले. पती (husband) सचिन सैन्य दलात कार्यरत आहे. मात्र, लग्न झाल्यापासून पती सचिन ठाकरे, सासू जयाबाई ठाकरे हे अश्विनीला कार (Car) घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत म्हणून त्रास देत होते.

दीडच महिन्यापूर्वी 1 लाख 30 हजार दिले

मुलीचा होणारा छळ पाहून अश्विनीच्या वडिलांनी दीड महिन्यापूर्वी सासरच्या मंडळींना 30 हजार रुपये दिले होते. तसेच मेव्हणे परशराम निवृत्ती पवार यांच्याकडून एक लाख रुपये उसने घेऊन सासरे दिलीप ठकाजी ठाकरे यांच्याकडे दिले होते. मात्र, उर्वरित पैसे न मिळाल्यामुळे अश्विनीचा छळ सुरू होता. या प्रकरणी नणंद पूनम मनोज गुंजाळ, ज्योती निवृत्ती पगार (रा. नाशिक), वर्षा अमोल शिरसाठ (रा. मुसळगाव ता. सिन्नर), मामे सासरे बाबूराव रेवजी शिंदे (रा. रामपूर नैताळे ता. निफाड) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

आठवड्यातील दुसरी घटना

नाशिक जिल्ह्यात विवाहिता मृत्यूची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी  पतीचे संन्यास वेड आणि सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कळवण तालुक्यातल्या अभोणा येथे घडली आहे. विशाखा शैलेश येवले असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अभोणा पोलिसांत पती व सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, विशाखाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विशाखाचे कुटुंबीय व गावकरी करीत आहेत.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.