AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : मामा-भाच्ये अंघोळीसाठी नदीत उतरले आणि शेवटच्या आवर्तनाचं पाणी वाढलं, ह्रदयद्रावक घटनेनं नाशिक हादरलं

नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातल्या आरम नदीपात्रात अंघोळीसाठी उतरलेल्या मामा-भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. गणेश-रोशन हे मामा-भाचे पोहण्यासाठी बंधाऱ्यात उतरले. मात्र, यापूर्वी खूपच कमी पाणी होते. आता केळझर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडल्याने पाणी वाढले होते. याचा अंदाज या दोघांना बांधता आला नाही. ते पात्रात उतरले. पाणी कमी समजून दूरवर चालत गेले. मात्र, येथेच त्यांचा घात झाला.

Nashik : मामा-भाच्ये अंघोळीसाठी नदीत उतरले आणि शेवटच्या आवर्तनाचं पाणी वाढलं, ह्रदयद्रावक घटनेनं नाशिक हादरलं
Breaking News
| Edited By: | Updated on: Apr 16, 2022 | 10:51 AM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या बागलाण (Baglan) तालुक्यातल्या आरम नदीपात्रात अंघोळीसाठी उतरलेल्या मामा-भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. गणेश रामचंद्र जगताप (वय 32) आणि रोशन देवेंद्र बागुल (वय 18) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही चाफ्याचा पाडा (देवपूर) येथील रहिवासी आहेत. या घटनेने पंचक्रोशीत शोककळा पसरलीय. हे दोघेही कपडे धुण्यासाठी घरातील महिलांसोबत गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून (drown) मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. सध्या केळझर नदीपात्रातून आरम नदीमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. हे रब्बीसाठीचे शेवटचे आवर्तन असल्याचे समजते. त्यामुळे नदीला पाणी आले. हे पाहून जगताप कुटुंब घरातील महिलांसह कपडे धुण्यासाठी नदीपात्रावर गेले. घरातील महिलांनी कपडे धुतले. त्यानंतर त्या घरी निघाल्या. मात्र, गणेश आणि रोशन हे मामा-भाचे अंघोळीसाठी म्हणून दोघेच नदीवर थांबले. ते दहिंदुले येथील बंधाऱ्यात उतरले होते.

नेमके झाले काय?

गणेश-रोशन हे मामा भाचे पोहण्यासाठी बंधाऱ्यात उतरले. मात्र, यापूर्वी खूपच कमी पाणी होते. आता केळझर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडल्याने पाणी वाढले होते. याचा अंदाज या दोघांना बांधता आला नाही. ते पात्रात उतरले. पाणी कमी समजून दूरवर चालत गेले. मात्र, येथेच त्यांचा घात झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाल्याचे समोर येत आहे. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

रोशन होता बारावीला

गणेश आणि रोशन यांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर चाफ्याचा पाडा येथे अंतिम संस्कार करण्यात आले. यातील रोशन याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्याला आता निकालाचे आणि पुढील करिअरचे वेध लागले होते. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच सटाणा पोलीस ठाण्याचे हवालदार जे. ए. सोळंकी, जे. डी. लव्हावेर, पोलीस नाईक एन. एस. भोये यांनी या ठिकाणी भेट दिली. या प्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.