AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ST चालकाच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, मालेगावातील रुग्णालयात उपचार सुरु

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केलं आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली होती.

ST चालकाच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, मालेगावातील रुग्णालयात उपचार सुरु
संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 1:42 PM
Share

नाशिक(मालेगाव): राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केलं आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. महागाई भत्ता आणि घरभाडे आणि पगार यासह इतर मुद्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. राज्य सरकारनं 28 ऑक्टोबरला एसटी कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा केली होती. त्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन संपलेलं नाही. काही संघटनांनी आंदोलन सुरु ठेवलं आहे. अहमदनगरमध्ये काल एका एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली होती. मालेगावात एसटी चालकाच्या मुलानं आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित मुलावर मालेगावात खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

एसटी चालकाच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

मालेगावात एसटी चालकच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. नाशिकच्या मालेगावात शिवसाद शिंदे यांच्या मुलानं विषप्राशन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. वडिलांना एसटीकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात मनासारखं शिक्षण घेता येत नाही त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. शिंदे यांच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अहमदनगरमध्ये एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

अहमदनगरला शेवगाव येथील एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केलीये. शुक्रवारी सकाळी ही घटना घडलीये. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली. शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे वय 50 असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

इतर बातम्या:

आटपाडी डेपोला कुलुप, आंदोलन सुरुच राहणार, ठाकरे सरकारला इशारा, एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर गोपीचंद पडळकर आक्रमक

महाराष्ट्राची सेवा करणाऱ्या ST कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणं लाजिरवाणी गोष्ट, पण सरकारला आर्यन खानची काळजी: गोपीचंद पडळकर

Nashik Malegoan ST Driver son trying to commit suicide by drinking poison

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.