AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक-पुणे मार्गासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना पाच पट मोबदला मिळवून देणार: छगन भुजबळ

नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने हे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या शेतकऱ्यांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलासा दिला आहे.

नाशिक-पुणे मार्गासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना पाच पट मोबदला मिळवून देणार: छगन भुजबळ
chhagan bhujbal
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 5:00 PM
Share

नाशिक: नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने हे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या शेतकऱ्यांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलासा दिला आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्गातील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात पाच पट मोबदला मिळवून देण्यात येईल. कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही छगन भुजबळ यांनी दिली आहे. (nashik-pune railway project affected people met chhagan bhujbal)

नाशिक तालुक्यातील नानेगाव व परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी भुजबळांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी भुजबळांनी शेतकऱ्यांशी सवांद साधून शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी बाधित शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे, केरू काळे, वासुदेव पोरजे, ज्ञानेश्वर काळे, अशोक आडके, योगेश काळे, प्रकाश आडके, सुकदेव आडके, मुकंद गोसावी, राजाराम शिंदे यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते.

21.5 हेक्टर बारमाही बागायती क्षेत्राचे भूसंपादन

मौजे नाणेगांव जिल्हा नाशिक येथे पुणे – नाशिक रेल्वे मार्गाचे भूसंपादन व अधिग्रहीत शेतजमिनीचे मोजणीचे काम सुरू आहे. सदर भूसंपादन हे गावातील 21.5 हेक्टर बारमाही बागायती क्षेत्राचे होणार आहे. या क्षेत्रात द्राक्षे, कांदा, ऊस, फळझाडे व इतर बागायती नगदी पिके घेतली जातात. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व भौगोलिक नुकसान होणार असून बाधित शेतकऱ्यांची जमिन बारमाही बागायती असल्यामुळे तसेच उदरनिर्वाहाचे साधन शेतीच असल्याने जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

कुटुंबातील एकाला नोकरी द्या

तसेच रेल्वेलाईनमुळे शेतकऱ्यांच्या क्षेत्राची दोन ते तीन तुकडयात विभागणी होणार असल्याने त्या संपूर्ण क्षेत्राची संमतीनुसार खरेदी करण्यात यावी, द्राक्षबागा निर्यातक्षम दर्जाच्या असल्याने त्या निर्यातदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे द्राक्षबाग शेती क्षेत्राची विभागणी झाल्यास उर्वरीत संपूर्ण द्राक्षबागेची व इतर साधन सामुग्रीची व बांधावरील फळझाडांचा योग्य मोबदला मिळावा. बाधित होणाऱ्या पाईपलाईन 25 मीटरवर क्रॉसिंग होण्याकरीता व्यवस्था असावी. पाईपलाईन विहीर, बोअरवेल यांचा योग्य मोबदला मिळावा. बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा व त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकास नोकरी मिळावी. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त रेड झोन नसावा, गावातील रेल्वेमार्गातील बाधित होणारे वागवहीवाटीचे रस्त्यांना क्रॉसिंग येणे जाण्याची योग्य ती व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे केलेल्या आहे.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येऊन शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा पाच पट मोबदला मिळवून देण्यात येईल. कुठल्याही बाधित शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले. (nashik-pune railway project affected people met chhagan bhujbal)

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update : पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी गावात 100% लसीकरण, शरद पवार यांनीही केलं कौतुक 

Maharashtra 5 level Unlock: अनलॉकच्या 5 लेव्हलमध्ये तुमच्या जिल्हा आणि महानगरपालिकेची स्थिती काय? रेड झोनमध्ये कोणते जिल्हे?

Maharashtra News LIVE Update | आषाढी वारी 2021 च्या नियोजनास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, आदेश जारी

(nashik-pune railway project affected people met chhagan bhujbal)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.