Maharashtra News LIVE Update | मिरजमधील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या

| Updated on: Jun 15, 2021 | 6:42 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates

Maharashtra News LIVE Update | मिरजमधील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi June 14 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Jun 2021 11:50 PM (IST)

    निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या दोन्ही पोरांवर केला गोळीबार, एका मुलाचा उपचारदरम्यान मृत्यू

    नवी मुंबई : ऐरोलीमध्ये निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या दोन्ही पोरांवर केला गोळीबार
    गोळीबारात एका मुलाचा उपचारदरम्यान मृत्यू
    3 गोळ्या लागल्याने मुलगा विजयचा मृत्यू
    एरोलीच्या इंद्रावती रुग्णालयात सुरू होते उपचार
    संध्याकाळी 6 च्या सुमारास घडली होती घटना
    गाडीच्या सर्व्हिसिंगच्या पैशांवरून बाप लेकात झाला होता वाद
    दोन्ही मुलं आई सोबत बोलत असताना माथेफिरु पित्याने झाडल्या गोळ्या
    माथेफिरू पिता पोलिसांच्या ताब्यात
  • 14 Jun 2021 09:57 PM (IST)

    मिरजमधील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या

    सांगली : मिरज शासकीय रुग्णालयातील डॉक्टरने केली आत्महत्या

    मृत्यूपूर्वी लिहलेली चिठ्ठी आढळली

  • 14 Jun 2021 09:51 PM (IST)

    भाईंदर येथे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर घरातील सिलिंगचा काही भाग कोसळला, एकाचा मृत्यू

    मीरा भाईंदर : भाईंदर पश्चिमेच्या रोज विल्ला इमारतीमच्या पहिल्या मजल्यावर घरातील सिलिंगचा काही भाग कोसळला

    यामध्ये कॅमी ब्रिटो वय 39 नामक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    घटनास्थळी मीरा भाईंदर अग्निशमन दलाचे जवान दाखल

  • 14 Jun 2021 09:27 PM (IST)

    रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर झडती, पोलिसांचं निलंबन

    जालना लोकसभेचे खासदार तथा केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर झडती घेतल्या प्रकरणी, जाफ्राबाद ठाण्यातील दोन पोलीस उपनिरीक्षकांसह तीन कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी आज तडकाफडकी निलंबित केले आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल सह उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे आणि यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

  • 14 Jun 2021 08:30 PM (IST)

    भाईंदर पश्चिमेच्या एका इमारतीचं सिलिंग कोसळलं, एका व्यक्तीचा मृत्यू

    मीरा भाईंदर:- भाईंदर पश्चिमेच्या रोज विल्ला इमारती मध्ये पहिल्या मजल्यावर घरातील सिलिंगचा काही भाग कोसळला...या मध्ये कॅमी ब्रिटो वय 39 नामक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मीरा भाईंदर अग्निशमन दलाच्या जवान दाखल

  • 14 Jun 2021 07:53 PM (IST)

    ऐरोलीमध्ये निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी आणि मुलावर केला गोळीबार

    नवी मुंबई : ऐरोलीमध्ये निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी आणि मुलावर केला गोळीबार

    माथेफिरू पिता पोलिसांच्या ताब्यात

    भगवान पाटील असं निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचे नाव

    गोळीबारात मुलाला 3 गोळ्या लागल्याने प्रकृती चिंतजनक

    एरोलीच्या इंद्रावती रुग्णालयात उपचार सुरू

    माजी शिवसेना नगरसेवक राजू पाटील यांचे ते नातेवाईक आहेत

  • 14 Jun 2021 07:25 PM (IST)

    बांधकाम व्यावसायिकाकडून 50 हजारांची लाच, पुणे मनपातील महिला अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

    पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडून 50 हजारांची लाच घेणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

    मंजुषा विधाते असे महिला अधिकाऱ्याचे नाव असून येत्या 30 जूनला त्या सेवानिवृत्त होणार आहेत

    त्यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    पुणे महानगरपालिकेत मंजुषा विधाते तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत

  • 14 Jun 2021 07:06 PM (IST)

    बारावीची परीक्षा रद्दची अधिकृत घोषणा, बोर्डानं काढलं अधिकृत परिपत्रक  

    पुणे : बारावीची परीक्षा रद्दची बोर्डाकडून अधिकृत घोषणा

    कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून परीक्षा रद्दचं स्पष्टीकरण

    23 मे 29 जून दरम्यान होणार होती परीक्षा

    मात्र अखेर बारावीची परीक्षा रद्द झाल्याचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून जाहीर

    बोर्डानं काढलं अधिकृत परीक्षा रद्दचं परिपत्रक

  • 14 Jun 2021 06:27 PM (IST)

    राम मंदिर जमीन घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे : अरविंद सावंत

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर दोन्ही राजे एकत्र आले याचं स्वागत आहे. पण दोन्ही राजे राजे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहेत. त्यामुळे केंद्राच्या भूमिकेबद्दल ते बोलत नाहीत. मिठाला जागल्या सारखं ते बोलत आहेत, अशी टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली.

    घटनेप्रमाणे निर्णय घेतला गेला पाहिजे. पण राज्यपाल निव्वळ राजकारण करत आहेत. राज्यापाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत घटनेची पायमल्ली होत आहे.

    राम मंदिर जमीन घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. राम मंदिराबद्दल आमच्या भावना स्पष्ट आहेत. धर्माच्या भावनांशी खेळू नये

  • 14 Jun 2021 06:23 PM (IST)

    नागपूर पोलीस दलात नवीन 72 दुचाकी आणि 14 चारचाकी वाहनांचा समावेश

    नागपूर : नागपूर पोलीस दलात नवीन 72 दुचाकी आणि 14 चारचाकी वाहनांचा समावेश

    डीपीडिसीच्या निधीतून देण्यात आले पोलिसांना वाहन

    चार्ली पोलीस करणार या वाहनांचा वापर

    शहरात गस्त घालणे, गुन्हेगारांच्या शोध घेणे, महिला छेडछाड प्रकरणावर आळा घालण्यासाठी वेगळ्या ड्रेसमधील चार्ली पथक

    पोलिसांची पेट्रोलिंग वाढण्यासाठी होणार या वाहनांचा मोठा उपयोग

    पालकमंत्री नितीन राऊत यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पोलीस दलात दाखल करण्यात आले वाहन

  • 14 Jun 2021 05:53 PM (IST)

    साताऱ्यात खंबाटकी घाटात आढळला अर्धवट जळालेला स्त्री जातीचा मृतदेह

    सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात अर्धवट जळालेल्या अवस्थेत स्त्री जातीचा मृतदेह सापडला

    खंडाळा पोलीस घटनास्थळी दाखल

    महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु

    अज्ञातांविरोधात खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल

  • 14 Jun 2021 05:36 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी 26 जून रोजी औरंगाबाद येथे मेळावा, 36 जिल्हात मेळावे घेणार : विनायक मेटे

    औरंगाबाद विनायक मेटे पत्रकार परिषद मुद्दे

    5 तारखेला बीड येथून आंदोलनास सुरुवात करण्यात आलीय

    मराठा आरक्षणाची जनजागृती करण्यासाठी सध्या दौऱ्यावर असून 26 जून रोजी औरंगाबाद येथे मेळावा घेणार

    सोलापूरलादेखील जुलैच्या पहिल्या आठवड्यात मेळावा

    36 जिल्हात मेळावे घेणार

    विभागीय कार्यालयावर मोर्चा काढणार

    27 जुनला मुंबईला 10 हजार बाईकची रॅली काढण्यात येणार

    5 जुलैपर्यंत सर्व प्रश्न सुटले नाहीत तर 7 जुलै रोजी होणारे अधिवेशन चालू देणार नाही

    राज्यात 36 जिल्हात 36 मेळावे घेणार

    मराठा समाजाला पाठिंब्याचे माओवाद्यांनी दिलेले पत्र सरकारला धोक्याची घंटा आहे

    माओवाद्यांच्या सहनभूतीच्या जाळ्यात पिचलेले मराठा तरुण सापडले तर सामाजिक दृष्टीने महाराष्ट्राचे नुकसान होईल

    माओवाद्यांच्या प्रश्नावर एकही प्रतिक्रिया सरकारकडून येत नाही हे दुर्दैव

  • 14 Jun 2021 05:15 PM (IST)

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मार्गावर 63 गतिरोधकांनी पर्यटक त्रस्त

    चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मार्गावर 63 गतिरोधकांनी पर्यटक त्रस्त

    ताडोबाला येणाऱ्या पर्यटकांना वेग शिस्तीपेक्षा शिक्षाच अधिक

    आसपासच्या पंधरा ग्रामपंचायतीत राहणाऱ्या ग्रामस्थांना भोगावा लागतोय अधिक त्रास

    वन्यजीवांना वेगापासून संरक्षण मिळावे यासाठी उभारण्यात आलेले ब्रेकर ठरत आहेत मृत्यूचे कारण

    एका विद्यमान सरपंच महिलेचा रुग्णालयात पोहोचताना झाला गर्भपात तर दुसऱ्या एका बालकाला सर्पदंशानंतर उशिरा मिळाले उपचार

    गतिरोधकांच्या मोठ्या संख्येमुळे नागरिकात पसरला रोष

    अधिकाऱ्यांनी मात्र गर्भपात- सर्पदंश मृत्यूला गतिरोधकांशी जोडणे चुकीचे असल्याचे मांडले मत

  • 14 Jun 2021 04:36 PM (IST)

    आषाढी वारी 2021 च्या नियोजनास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, आदेश जारी

    पंढरपूर - आषाढी वारी 2021 च्या नियोजनास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्याबाबतचा एक आदेश निघालेला आहे

    मानाच्या दहा पालख्यांना पंढरपूरकडे एसटी बसने प्रस्थान करता येणार आहे. वाखरीपासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत  पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पायी चालण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

    श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा ही गतवर्षीप्रमाणे नियम पाळून होणार आहे.

    आषाढी एकादशीच्या दिवशी शासनाने परवानगी दिलेल्या 195 संत महाराज मंडळींना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे.

    पौर्णिमेच्या दिवशीचा काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर या सर्व पालख्या आपापल्या ठिकाणी परत फिरतील.

  • 14 Jun 2021 04:27 PM (IST)

    दोन्ही राजांनी दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारला वाकवून दबाव आणावा - विनोद पाटील

    मुंबई : छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजे हे एकत्र आले असल्याने ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून आता दोन्ही राजांनी मिळून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर दबाव आणावा. त्यांंनी मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाला पर्यायी व्यवस्था करून द्यावी यासाठी दबाव आणावा मागणी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलीये. दोन्ही राजे एकत्र येत दिल्ली सरकार आणि महाराष्ट्र सरकारला वाकवतील अशी आशा व्यक्त करत आरक्षणाच्या प्रश्नी दबाव आणावा अशी विनंती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केलीये.

  • 14 Jun 2021 03:58 PM (IST)

    शहापूर पोलिसांची धाडसी कारवाई, दुचाकी चोरांना पकडले

    शहापूर : शहापूर पोलिसांची धाडसी कारवाई

    3 दुचाकी चोरांना पकडले

    चोरी केलेल्या 10 दुचाकीसह चोरट्यांना अटक

  • 14 Jun 2021 03:09 PM (IST)

    बेलापूर किल्ल्याचा बुरुज ढासळल्यामुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आक्रमक

    नवी मुंबई : बेलापूर किल्ल्याचा बुरुज ढासळल्यामुळे नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मावळ्यांच्या वेशात सिडको भवनवर धडक

    सिडको भवनाबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी

    कंत्राट रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा - नितीन चव्हाण

  • 14 Jun 2021 01:36 PM (IST)

    सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण

    - सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालंय

    - सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडसह देशभरात मोठी खळबळ माजली होती,

    - त्याच्या बांद्रातील घराबाहेर चाहत्यांची गर्दी वाढू लागलीये

    - त्यांनी मेणबद्दी आणि पुष्पगुच्छ ठेवत त्याला श्रद्धांजली अर्पण केलीये

    - सुशांतला न्याय मिळावा यासाठी त्याचे चाहते भावूक झालेयत

    - अनेकांनी बड्या माफीयांवर टिकास्त्र सोडलंय

    - सुशांतच्या मृत्यूचं गूढ आजही कामय आहे. सुशांतची आत्महत्या ही हत्या असल्याचा दावा अनेकांनी केला आहे

    - सुशांतच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारणदेखील चांगलंच तापलं होतं.

    - आजही त्याच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी सीबीआय चौकशी सुरु आहे...

  • 14 Jun 2021 01:34 PM (IST)

    दूध दर आणि शेतकरी प्रश्नांसाठी पुन्हा एकदा एल्गार, 17 जूनला राज्यव्यापी आंदोलनाची हाक

    दूध दर आणि शेतकरी प्रश्नांसाठी पुन्हा एकदा एल्गार

    17 जूनला राज्यव्यापी आंदोलनाची हाक

    किसान सभेच्या बैठकीत आंदोलनावर शिक्कामोर्तब

    17 जूनला राज्यातील सर्व तहसील समोर आंदोलन

    किसान सभेचे नेते अजित नवले यांची माहिती

    अनेक वेळा मागणी करूनही दूध उत्पादकांच्या पदरी निराशाच

  • 14 Jun 2021 01:11 PM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील आमगाव देवळी येथिल नाल्यात दोन मुलं बुडाले

    नागपूर -

    नागपूर जिल्ह्यातील आमगाव देवळी येथिल नाल्यात दोन मुलं बुडाले

    काल पासून होते बेपत्ता , पोलीस आणि परिवारातील लोक घेत होते शोध

    नाल्याच्या काठावर कपडे मिळाल्याने नाल्यात शोध घेतला असता दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले

    हिंगणा पोलीस करत आहे चौकशी

    मृतक दोघेही बहीण भाऊ आहेत

    आरुषी नामदेव राऊत वय १० वर्ष आणि अभिषेक नामदेव राऊत अशी मृतकांचे नाव आहे

  • 14 Jun 2021 12:36 PM (IST)

    मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार सकारात्मक दिसतंय, अजित पवार यांच्या भेटीनंतर शाहू छत्रपतींची प्रतिक्रिया

    मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार सकारात्मक दिसतंय

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर शाहू छत्रपतींची प्रतिक्रिया

    सोळा तारखेला होणाऱ्या आंदोलनाबाबत मात्र कोणतीही चर्चा नाही

    मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्या सुविधा देता येतील याबाबत चर्चा झाल्याची शाहू छत्रपतींची माहिती

  • 14 Jun 2021 12:30 PM (IST)

    राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील चेंबूरमध्ये प्रती बाईकस्वार पन्नास रुपयांचं कुपन वाटप

    - राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील चेंबूरमध्ये प्रती बाईकस्वार पन्नास रुपयांचं कुपन वाटप...

    - पेट्रोल पंपावर कुपन घेण्यासाठी बाईक स्वारांची लांबचा लांब रांग...

    - रांगेत ऊभ्या असलेल्या बाईक स्वारांना मनपा निवडणुकांमध्ये मनसेलाच मत द्या असा प्रचार...

    - वाढदिवसानिमित्ताने मनसेची मतबांधणी सुरू

  • 14 Jun 2021 11:33 AM (IST)

    इंचलकरंजी शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली निदर्शने

    इचलकरंजी -

    शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली निदर्शने

    कोल्हापूरला घेणाऱ्या मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा घेतला होता निर्णय पोलिसांच्या मदतीनं तर आंदोलन मागे

    सोळा तारखेच्या आंदोलनाला मोठ्यांचा किनी कोल्हापूरला जाणार

    महाराष्ट्र राज्यातील एकाही मंत्र्याला राज्यात फिरून देणार नाही असा दिला इशारा

  • 14 Jun 2021 11:32 AM (IST)

    संत मुक्ताबाई आषाढी वारी पालखी सोहळ्याचे मोजक्या वारकरी संप्रदायात प्रस्थान सोहळा सुरु

    मुक्ताईनगर -

    10 मानाच्या पालखींमध्ये मुक्ताईनगरच्या आदिशक्ती मुक्ताई पालखीचा समावेश असल्यामुळे आज संत मुक्ताबाई आषाढी वारी पालखी सोहळ्याचे मोजक्या वारकरी संप्रदायात प्रस्थान सोहळा सुरु

    पालकमंत्री गुलाबराव पाटील माजी मंत्री एकनाथ खडसे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील मोजक्या भाविकांचा उपस्थितीत सुरु

    सर्वच राजकीय पक्षांच्या उपस्थित सोहळा सुरू

  • 14 Jun 2021 11:31 AM (IST)

    कृष्णा नदीत उडी मारलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला

    सातारा : कृष्णा नदीत उडी मारलेल्या व्यक्तीची मृतदेह सापडला...

    तब्बल 36 तासानंतर मृतदेह शोधुन काढण्यात यश....

    शनिवारी संध्याकाळच्या सुमारास संगममाहुली येथील पुलावरुन मारली होती उडी....

    खिदमत ए ख्लक या संस्थेच्या स्वयंसेवकांकडुन मृतदेह शोधुन काढण्यात यश...

    अज्ञात मृतदेहाचे ओळख पटवण्याचे काम सुरु...

  • 14 Jun 2021 10:38 AM (IST)

    मनमाडमध्ये निर्दयी आईने नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला फेकले

    मनमाड - निर्दयी आई ने नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला फेकले

    देवळा तालुक्यातील वासोळ येथील घटना

    बाळाच्या पायाला कुत्र्याने चावा घेतल्याने पायाला झाली गंभीर इजा

    बाळावर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

  • 14 Jun 2021 10:14 AM (IST)

    राज्याच्या कृषी राज्यमंत्र्यांच्या गावातच खताची टंचाई

    सांगली  -

    राज्याच्या कृषी राज्यमंत्र्यांच्या गावातच खताची टंचाई.

    कडेगांव येथील अंजली अमित पवार या शेतकरी महिलेने थेट राजू शेटटी यांच्याकडे मांडली खत टंचाईची कैफियत.

  • 14 Jun 2021 09:52 AM (IST)

    वर्ध्याच्या रिधोरा येथील पंचधारा धरणाच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

    वर्धा

    - रिधोरा येथील पंचधारा धरणाच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

    - मित्राचा वाढदिवस साजरा करण्याकरिता गेला होता धरणावर

    - पोहण्याचा मोह न आवरल्याले तो धरणाच्या पाण्यात उतरला

    - पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू

    - अंकित जितेंद्र टेभूरणे अस 21 वर्षीय मृत युवकाच नाव

  • 14 Jun 2021 09:21 AM (IST)

    बारामतीच्या पश्चिम भागातील बिबट्या आता पुरंदर तालुक्यात

    पुरंदर : बारामतीच्या पश्चिम भागातील बिबट्या आता पुरंदर तालुक्यात.. - पंधरा दिवसांपूर्वी बारामतीच्या मगरवाडी, वाकी, गडदरवाडी परिसरात होता बिबट्याचा वावर.. - पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील शेतकऱ्यांना झालं बिबट्याचं दर्शन.. - बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण..

  • 14 Jun 2021 09:21 AM (IST)

    बारामतीच्या बसस्थानकाचं रुप पालटणार, ५० कोटी रुपये खर्चून नव्या बसस्थानकाची उभारणी

    बारामती :

    बारामतीच्या बसस्थानकाचं रुप पालटणार..

    - ५० कोटी रुपये खर्चून नव्या बसस्थानकाची उभारणी..

    - नवीन बसस्थानकाच्या कामाला सुरुवात..

    - बारामती बसस्थानकाचं तात्पुरतं स्थलांतर..

    - नवीन बसस्थानक पूर्ण होईपर्यंत एसटी कार्यशाळेतून होणार बस वाहतुक...

  • 14 Jun 2021 09:20 AM (IST)

    टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा दणका, वाळू उपसा होत असलेल्या गोदापात्राला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

    औरंगाबाद -

    टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा दणका

    वाळू उपसा होत असलेल्या गोदापात्राला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

    गोदावरी पत्रातून मोटारसायकलद्वारे वाळू उपसा होत आल्याची tv9 ने दाखवली होती बातमी

    मोटारसायकलचा वापर करत गोदावरी पत्रातून सुरू होता तुफान वाळू उपसा

    वाळू उपस्याची बातमी देताच जिल्हाधिकारी ऍक्शन मोडवर

    अवैध वाळू साठे जप्त करण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आदेश

  • 14 Jun 2021 09:19 AM (IST)

    घाटकोपरच्या एका बड्या व्यावसायिकाला अंडरवर्ल्ड गँगस्टर फहीम मचमचच्या नावाने धमक्या

    घाटकोपरच्या एका बड्या व्यावसायिकाला अंडरवर्ल्ड गँगस्टर फहीम मचमचच्या नावाने धमक्या देण्यात आल्या

    परदेशातून आलेल्या या फोन कॉलद्वारे या गुंडाने 50 लाख रुपयांच्या खण्डनीची मागणी केली

    व्यापारयाच्या तक्रारीनंतर घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

    गुन्हा नोंदवल्यानंतर आता गुन्हे शाखेच्या अँटी-एक्स्टर्शन सेलने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

  • 14 Jun 2021 08:01 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 53 वा वाढदिवस आहे

    मुंबई -

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 53 वा वाढदिवस आहे

    यंदा सुद्धा वाढदिवस साधे पद्धतीने साजरा होणार आहे

    राज ठाकरे यांनी मनसैनिकाना आव्हान केल आहे की कोरोना असलेल्या घराबाहेर गर्दी करू नका

    दरवर्षी तुमच्या भेटण्यान मला एक ऊर्जा मिळते पण यंदा सुद्धा भेटण्यासारखी परिस्थिती नाही

    असं आव्हान राज ठाकरे यांनी केलंय

  • 14 Jun 2021 07:17 AM (IST)

    हिंगोलीत राज्य महामार्गावरील पुलाच्या खड्ड्यात गाडी पडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

    हिंगोली -

    राज्य महामार्गावरील पुलाच्या खड्ड्यात गाडी पडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

    हिगोली च्या सेनगाव जवळील धक्कादायक घटना

    चोघे मृत लोणार तालुक्यातील खळेगाव ,पळखेडा इथले रहिवाशी

    रखडलेल्या पुलावर कोणताही बोर्ड न लावल्यामुळे घडली घटना

    खड्ड्यात फोर व्हीलर गाडी पडल्याने पाण्यात गुदमरून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

  • 14 Jun 2021 07:09 AM (IST)

    70 हजार ‘आशां’चा मंगळवारपासून बेमुदत संपाचा निर्णय

    'आशां'च्या राज्यव्यापी संघटनांच्या बैठकीत बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला आमची सुरक्षा, आमचे कुटुंब, कष्ट आणि मानधन यावर सरकार कोणताच ठोस निर्णय घेत नाही, असं संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

  • 14 Jun 2021 06:59 AM (IST)

    काँग्रेसध्ये व्यापक सुधारणा आवश्यक कपिल सब्बिल यांचा घरचा आहेर

    काँग्रेसमध्ये तात्कळ संघटनात्मक विवडणुकांची आवश्यक्ता आहे पक्ष पुस्तावलेला नाही. हे दाखवण्यासाठी मध्यवर्ती आणि राज्य पातळीवर व्यापक सुधारणांची गरज आहे - कपिल सब्बिल

  • 14 Jun 2021 06:47 AM (IST)

    जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख जिओना चाना यांचं निधन

    जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख मानले जाणारे जिओना चाना  यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा (CM Zoramthanga) यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. चाना यांच्या कुटुंबात सध्या त्यांच्या एकूण 38 बायका आणि 89 मुलं आहेत. हे जगातलं सर्वात मोठं कुटुंब मानलं जात होतं, त्यामुळं मिझोरममधील पर्यटकांच्या आकर्षणाचे ते केंद्र होते.

  • 14 Jun 2021 06:42 AM (IST)

    पुणे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर बेकायदेशीररित्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन,13 जणांवर गुन्हा

    खंडाळा तालुक्यातील पळशी येथील दत्तनगर भागातील डोंगराच्या लगत असणा-या मोकळ्या जागेत बेकायदेशीररित्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकांसह 13 बैलगाडी चालकांविरुध्द शिरवळ पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरवळ पोलीसांनी दोन वाहनांसह तब्बल नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या घटनेमुळे खंडाळा तालुक्यासह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Published On - Jun 14,2021 6:40 AM

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.