Malegaon | केरसाने गावातील शेतकऱ्यांनी पाणी अडवल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप, सटाणा आगाराने बस सेवा केली बंद!

नाशिकच्या बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील दसाणे गावालगतच जंगलातील तसेच शेतातील पाण्याचा विसर्ग शेजारीच असलेल्या केरसाने येथील गावकऱ्यांनी रस्त्यावर बांध घालून पाणी अडवल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. काही शेतकऱ्यांच्या अडमुठ्यापणामुळे स्थानिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.

Malegaon | केरसाने गावातील शेतकऱ्यांनी पाणी अडवल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप, सटाणा आगाराने बस सेवा केली बंद!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 9:27 AM

मालेगाव : नाशिक (Nashik) जिल्हात दमदार पावसाने हजेरी लावलीयं. यानंतर नद्यांना पूर देखील आला. पावसामुळे आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, हरणबारी, केळझर ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. धरणांमधून केलेल्या पाण्याच्या विसर्गाने जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर (Flood) आल्याचे दिसून आले. नाशिकसह राज्यात यंदा उशीरा पण जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान (Damage) झाले. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील केरसाने गावातील रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.

सटाणा आगाराने केली बस सेवा बंद

नाशिकच्या बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील दसाणे गावालगतच जंगलातील तसेच शेतातील पाण्याचा विसर्ग शेजारीच असलेल्या केरसाने येथील गावकऱ्यांनी रस्त्यावर बांध घालून पाणी अडवल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. काही शेतकऱ्यांच्या अडमुठ्यापणामुळे स्थानिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. या पाण्यातून ये-जा करणे देखील शक्य होत नसल्याने सटाणा आगाराने आपली बससेवा देखील बंद केलीयं.

हे सुद्धा वाचा

nashik

शेतकऱ्यांचा अतिक्रमणांचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना

सटाणा आगाराने बससेवा बंद केल्याने प्रवाशांचे तसेच शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याचे समजते, त्यामुळे पाण्याचा विसर्ग होत नाही. मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होत असून संपूर्ण रस्ता जलमय झाला आहे. त्यामुळे पायी चालत जाणे अवघड झाले आहे. बस बंद असल्याने गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी शाळेत देखील गेले नाहीयंत. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.