AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा धोका वाढल्याने नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय; लग्न सोहळ्यांवर पुन्हा निर्बंध

आगामी काळात हे निर्बंध आणखी कठोर होऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. | Nashik Coronavirus

कोरोनाचा धोका वाढल्याने नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय; लग्न सोहळ्यांवर पुन्हा निर्बंध
पुणे जिल्ह्यात लग्नसमारंभांवर पुन्हा निर्बंध लादले जाऊ शकतात. स्थानिक प्रशासनाकडून तशा जोरदार हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
| Updated on: Feb 18, 2021 | 10:03 AM
Share

नाशिक: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या (Coronavirus patient) पुन्हा झपाट्याने वाढायला लागल्यामुळे नाशिक प्रशासनाकडून एक महत्त्वाची निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यात लग्नसोहळ्यांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता लग्नाला फक्त 100 लोकच उपस्थित राहू शकतील. (New rules for wedding ceremony in Nashik due to corona patient number increases)

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी हे आदेश जारी केले आहेत. तसेच आगामी काळात हे निर्बंध आणखी कठोर होऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. याशिवाय, नाशिकमधील प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये पुन्हा फलक लावण्यासही सुरुवात झाली आहे. कोरोनाचा एखादा रुग्ण आढळून आल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी केली जाणार आहे.

पुण्यात लग्न समारंभांवर पुन्हा निर्बंध? प्रशासनाच्या हालचालींना वेग

नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्रास धाब्यावर बसवले जात असल्याने आता पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात पुणे जिल्ह्यात लग्नसमारंभांवर (Wedding ceremony) पुन्हा निर्बंध लादले जाऊ शकतात. स्थानिक प्रशासनाकडून तशा जोरदार हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असताना पुणे जिल्हा हा हॉटस्पॉट बनला होता. तशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून यावेळी स्थानिक प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून लग्नसमारंभांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

मुंबईतील चार भागात वाढती रुग्णसंख्या

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईतील के ईस्ट (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड (मुलुंड), आर सेंट्रल (बोरिवली), एम वेस्ट (चेंबूर, टिळक नगर) या भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं सांगितलं. हे चारही वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट ठरताना दिसत आहेत. मुंबईत दररोज कोरोना रुग्णांची संख्या 10 ते 15 टक्क्याने वाढत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. (Mumbai Local Without Mask passengers action in railway)

कुठे किती रुग्णसंख्या?

चेंबूर, टिळक नगर आणि मुलुंड भागात रुग्णसंख्यावाढीचा दर सर्वाधिक- 0.26% एवढी आहे. अंधेरी, जोगेश्वरीमध्ये 334, मुलुंडमध्ये 289, बोरिवलीत 402 आणि टिळक नगर, चेंबूरमध्ये 172 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

संबंधित बातम्या :

मुंबईतल्या चार वॉर्डात कोरोना रुग्णसंख्या वाढली, इमारतींना नोटीसा; पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये!

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आता मदत पुनर्वसन मंत्री म्हणतात, लॉकडाऊनचा गांभीर्याने विचार सुरु

(New rules for wedding ceremony in Nashik due to corona patient number increases)

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.