नाशिकमध्ये असं काय आहे की नागपुरलाही नाही? गडकरी म्हणाले मला इथं दोन गोष्टी आवडल्या

नाशिकमधील दोन गोष्टी मला खूप आवडल्या. नाशिकसारख्या अभ्यासिका कोठेही नाहीत. तसेच इथले हवामान आमच्या नागपूरमध्येदेखील नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक शहराची स्तुती केली.

नाशिकमध्ये असं काय आहे की नागपुरलाही नाही? गडकरी म्हणाले मला इथं दोन गोष्टी आवडल्या
NITING GADKARI
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 8:52 PM

नाशिक : नाशिकमधील दोन गोष्टी मला खूप आवडल्या. नाशिकसारख्या अभ्यासिका कोठेही नाहीत. तसेच इथले हवामान आमच्या नागपूरमध्येदेखील नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक शहराची स्तुती केली. आज गडकरी यांच्या हस्ते पंचवटी भागातील पंडित दिनदयाळ उपाध्याय थीम पार्कचे लोकापर्ण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

नाशिकमध्ये मला दोन गोष्टी खूप आवडल्या

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या कामाच्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. महाराष्ट्रातील शहरांच्या भौगोलिक परिस्थितीचं त्यांना उत्तम ज्ञान आहे. यावेळी बोलताना त्यांनी नाशिक शहराच्या वैशिष्यांबद्दल सांगितलं. नाशिकमध्ये दोन गोष्टी मला खूप आवडल्या. नाशिक सारख्या अभ्यासिका भारतात कुठेही नाहीत. इथले हवामान आमच्या नागपुरमध्येही नाही. येथील कार्यालये, त्यांना असलेली पार्किंग अतिशय उत्तम आहे. नाशिक ग्रीन आणि सुंदर असेच रहावे, असे नितीन गडकरी म्हणाले.

गोदावरी सुंदर, हवामान मस्त आहे

तसेच नाशिक शहराबद्दल बोलताना आपल्या पत्तीसोबत झालेला संवाददेखील गडकरी यांनी यावेळी सांगितला. माझी पत्नी विमानात माझ्यासोबत होती. नाशिकची शेती किती सुंदर आहे. गोदावरी सुंदर आहे. हवामान मस्त आहे, असं ती मला सांगत होती, असे नितीन गडकरी म्हणाले. तसेच नाशिक शहराचा विकास आणि हवामान याबद्दल बोलताना त्यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांनी शहराचा अभ्यास करावा. शहराला सुंदर ठेवण्यासाठी आणखी प्रयत्न करावा, असा सल्लादेखील दिला.

सर्व ध्वनि प्रदूषणला मी जबाबदार 

तसेच पुढे बोलताना त्यांनी ध्वनी प्रदूषणावरदेखील भाष्य केले. 5 वर्षात नागपूर शहर ध्वनी, जल आणि वायू प्रदूषणमुक्त करेल असं मी ठरवलंय. प्रत्येक शहराच्या महापौर आणि आयुक्तांनी ठरवल्यास आपण पुढे जाऊ शकतो. सर्व ध्वनिप्रदूषणला मी जबाबदार आहे. त्यामुळे लाल दिवे मी बंद केले आहेत. यामुळे बरेच जण माझ्यावर नाराज आहेत. आता मी आणखी एक नवा कायदा करणार आहे. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू किंवा कोणतीही कार असो, कर्कश आवाज चालणार नाही. रुग्णवाहिका तसेच पोलिसांच्या गाडीचाही कर्कश आवाज चालणार नाही, असे नितीन गडकरी यांनी भाषणादरम्यान सांगितले.

इतर बातम्या :

डोंबिवली बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका, त्यांचं सुरक्षितस्थळी पुनर्वसन करा : रामदास आठवले

तारक मेहताचे नट्टू काका हरपले, अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय-काय घडलं

(nitin gadkari appreciates nashik city environment godavari river study centre)

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.