Video : इथं राम क्वारंटाईन झाला 14 दिवस सीतेनं डोकवून नाही पाहिला रे, इंदोरीकर महाराजांची टोलेबाजी

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका कीर्तनाच्या कार्यक्रमात इंदोरीकर महाराज यांनी त्यांच्या शैलीत आणखी एक वक्तव्य केलं आहे. रामायणाचा दाखला देत इंदोरीकर महाराजांनी टोला लगावला आहे.

Video : इथं राम क्वारंटाईन झाला 14 दिवस सीतेनं डोकवून नाही पाहिला रे, इंदोरीकर महाराजांची टोलेबाजी
Indorikar Maharaj
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 6:35 PM

नाशिक: कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर सध्या कोरोना लसीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं चर्चेत आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका कीर्तनाच्या कार्यक्रमात इंदोरीकर महाराज यांनी त्यांच्या शैलीत आणखी एक वक्तव्य केलं आहे. रामायणाचा दाखला देत इंदोरीकर महाराजांनी टोला लगावला आहे. राम वनवासाला गेला तेव्हा त्यानं सीतेला सोबत नेलं होतं. आता राम क्वारंटाईन झाला तर सीतेन डोकवून पाहिलं नाही, डोकवून, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.

इंदोरीकर महाराज नेमकं काय म्हणाले?

“अहो 14 वर्ष वनवासाला गेला तर सीता घेऊन गेला. इथं राम चौदा दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेनं डोकवून नाही पाहिला रे”, असं वक्तव्य निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलं आहे.

घस घेतलीही नाही आणि घेणारही नाही

“कोरोना काळात शिक्षित लोकांनी चुकीचं वर्तन केलं. आपल्याच घरातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या व्यक्तींना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवलं. त्यांना चांगल्या ताटात जेवणं दिलं नाही. त्यांच्या अंथरायच्या पांघरायच्या गोधड्या जाळल्या. त्यांच्या हाताला स्पर्श होणार नाही, इतकं फटकून त्यांच्याशी वागले. इथं हात लावू नको, तिथं हात लावू नका.. अशी सगळी कोरोना काळात परिस्थिती होती. पण मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतंच नाही तर लस कशाला घ्यायची”, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.

लसीकरण नाही तर मन खंबीर ठेवणं हाच कोरोनावर उपाय

कोरोना आणि लसीविषयी अधिक स्पष्टीकरण देताना ते उपस्थितांना म्हणतात, “कोरोना काळात अनेकांचं निधन झालं, ज्यातली निम्मी माणसं हे टेन्शनने गेली.  प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर ही वेगवेगळी आहे. प्रत्येकालाच कोरोना होत नसतो. कोरोनावर मन खंबीर ठेवणं हाच उपाय आहे”, असं ते म्हणाले.

इतर बातम्या:

Video : कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद

इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात याचिका

Nivrutti Maharaj Indorikar statement on people behaviour during Corona Pandemic

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.