Chhagan Bhujbal: संजय राऊत यांचा 150 कोटींचा बॉम्ब, छगन भुजबळ यांनी दाव्यातील अशी काढली हवा, म्हणाले काय?

Chhagan Bhujbal On Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी 150 कोटी रुपयांची ऑफर देण्यात येत असल्याचा दावा केला. त्यावर आता प्रतिक्रिया समोर यायला लागल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी या दाव्यातील अशी काढली हवा

Chhagan Bhujbal: संजय राऊत यांचा 150 कोटींचा बॉम्ब, छगन भुजबळ यांनी दाव्यातील अशी काढली हवा, म्हणाले काय?
राऊतांचा 150 कोटींचा बॉम्ब, भुजबळ यांनी असा उलटवला डाव, म्हणाले काय?
| Updated on: Nov 22, 2026 | 12:47 PM

उमेश पारिक,प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी खासदारांना 150 कोटींची ऑफर देण्यात येत असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला. दोन दिवसांपासून ते या मुद्यावर भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. ही सर्वपक्षीय खासदारांना ऑफर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या दाव्यावर आता प्रतिक्रिया समोर येत आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राऊतांच्या मुद्यातील हवा काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी नाशिकमधील येवल्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते काय म्हणाले?

मग पुरावे तरी द्या

Loading...

मंत्री छगन भुजबळ यांनी राऊतांच्या डिलिमिटेशनवरील वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की दावे करून काही चालणार नाही. तुमच्याकडे काही पुरावे असतील पुढे ठेवले पाहिजे. कोणी म्हणतंय की शंभर कोटी, कोणी म्हणतो दीडशे, कोणी हजार कोटी म्हणतोय, याला काय अर्थ आहे. हे जे असे दावे आहे याला पुरावा नाही. याबद्दल चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असा टोला भुजबळांनी लगावला. त्यांनी राऊतांकडे पुरावे मागितले.

आनंदराज आंबेडकरांवर तीव्र नाराजी

अजितदादांबद्दल जालना येथील सभेत आनंदराज आंबेडकर यांनी असंवेदनशील वक्तव्य केले. त्यानंतर माफी मागायचे सोडून त्यांनी सारवासारव केली. त्यांच्या याभूमिकेवर छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आनंदराज आंबेडकर हे सुशिक्षित आहेत. सध्या जे लोक आपल्यामध्ये नाहीत. अतिशय दुर्दैवीरित्या अपघातामध्ये गेलेले आहेत. त्यांच्याबद्दल असे बोलणे बरोबर वाटत नाही. त्यांचं जे विधान आहे ते आमच्या सारख्याला तरी आवडलेलं नाही, असे भुजबळ म्हणाले.

पंतप्रधानांच्या वक्तव्याची पाठराखण

सोने खरेदी करू नका, असे आवाहन केले, त्यानंतर सोन्याचा भाव घसरला असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यावर बोलताना बरोबर आहे ना. त्यांनी त्यावेळी सांगितले होते खरेदी करू नका. आज जवळजवळ वीस, पंचवीस हजार रुपयांनी भाव कमी झाले. जी वस्तुस्थिती त्यांनी आपल्यासमोर मांडली यांची बरोबर आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली.

मंत्री छगन भुजबळ ऑन येवल्यातून उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली तर मी उभा राहील असे वक्तव्य आमदार सुहास कांदे यांनी केले. त्यावर स्वागत आहे, अशी एका वाक्यात भुजबळांनी सुहास कांदे यांच्या मागणीला बगल दिली. तर पंकजा मुंडे यांनी केलेले “लोकनेत्री”बनायचं होते या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांचे फॅन फॉलोवर खूप चांगले आहे आज सुद्धा त्या लोकनेत्री आहेतच, असे म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us