Santosh Deshmukh Case : ते कोकरु, कुठेही गेलं तरी सापडेल, सुरेश धस यांचे मोठे सूचक वक्तव्य
Suresh Dhas on Krishna Aandhale : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले. याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. त्याबाबत भाजपा आमदार सुरेश धस यांनी मोठे सूचक वक्तव्य केले आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले. याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते पोलीस यंत्रणेलाच नाही तर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला आणि विशेष तपास पथकाला चुकांडा देत आहे. त्याने यंत्रणाच नाही तर राज्य सरकारसमोर आव्हान उभं केलं आहे. काही जण त्याची हत्या झाल्याचा दावा करत आहेत. तर काहीजण दुसरा दावा करत आहेत. अशी चर्चा होत असतानाच भाजपा आमदार सुरेश धस यांनी कृष्णा आंधळे विषयी मोठे सूचक वक्तव्य केले आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही
संतोष देशमुख प्रकरणात आकाच्या आकाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. करुणा मुंडे यांनीही राजीनामा मागणी केली आहे. करुणा मुंडे यांच्याकडे पंकजा मुंडेंबाबत काय माहिती आहे, हे त्यांनाच विचारावं लागेल. आमच्याकडील सर्व माहिती आम्ही देतो. ती माय माऊली एकटी राहते, मुलं देखील तिच्यासोबत नाहीत. अंजली दमानिया यांनीच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार प्रकाश सोळंके यांनी मागणी केली आहे. आपण अद्याप त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, असे धस म्हणाले.




दहशतीने ५०० व्यापाऱ्यांनी परळी सोडले
आकांच्या पिलावळींच्या दहशतींमुळे परळीतील ५०० व्यापारी आणि लोकांनी गाव सोडलं असा आरोप धस यांनी केला. तिथं अनेक माफिया राख माफिया, वाळू माफिया आहे. आकाच्या आकाची पिलावळ आहे, त्यांचा सर्व माज आता जिरणार आहे. काही गोष्टी गोपनीय त्या बोलणं योग्य होणार नाही, तपास संपुष्टात येईल, असे ते म्हणाले.
कृष्णा आंधळे सायको
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत आहेत. याविषयी माध्यमांनी भाजपा आमदार सुरेश धस यांना प्रश्न केला. त्यावेळी त्याचा तपास सुरू आहे. कृष्णा आंधळे हाच पोलिसांच्या कामगिरीवरील कलंक असल्याचेते म्हणाले. कृष्णा हा छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस भरतीची तयारी करत होता. मात्र तो गुन्हेगारीकडे वळाला. त्याला आई-वडील, कुटुंबाशी काहीच देणंघेणं नाही. तो अनेक गुन्ह्यात फरार आहे.
कृष्णा आंधळे हा सायको आहे. तो काही नामचीन गुंड नाही. कृष्णा आंधळे हा परराज्यात असणार. ते कोकरू आहे, कुठेही गेला तरी तो सापडेल. आमचा पोलिस आणि गृह विभागावर पूर्ण विश्वास आहे, असे सुरेश धस म्हणाले.