Corona update | नाशिकमध्ये कोरोना वाढला, निर्बंधही वाढले; शहरातील सर्व शाळांना टाळे

नाशिक शहरातील सर्व शाळा आजपासून (3 मार्च) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (nashik school closed corona pandemic)

Corona update | नाशिकमध्ये कोरोना वाढला, निर्बंधही वाढले; शहरातील सर्व शाळांना टाळे
शाळा बंद
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 8:28 AM

नाशिक : जिल्ह्यात तसेच नाशिक शहरात (Nashik) कडक निर्बंध असूनसुद्धा येथे कोरोना रुग्णांची (corona pandemic) संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता नाशिक शहरातील सर्व शाळा आजपासून (3 मार्च) बंद ठेवण्यात येणार आहेत. नाशिक शहर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून त्यानुसार शहरातील शाळा येत्या 15 मार्चपर्यंत बंद असतील. (school in Nashik city will be closed upto 15 March due to Corona pandemic)

15 मार्चला घेणार पुढचा आढावा

राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपयांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्य तसेच जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे.  मात्र, कोरोनाला थोपवण्यात म्हणावे तेवढे यश येत नाहीये. नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसत आहे. नाशिक शहरामध्येसुद्धा अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, येथील प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहरातील सर्व शाळा येत्या 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील. तसेच, 14 तारखेनंतर कोरोनाची स्थिती काय असेल त्यावर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल. कोरोना स्थितीचा 15 मार्च रोजी आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच शाळा सुरु करायच्या की नाही हे ठरवले जाईल.

तसेच कोरोना वाढत असला तरी 10 आणि 12 इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमती दिली तरच या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाईल, असेही येथील प्रशासनाने ठरवले आहे.

शहरात रात्रीची संचारबंदी

दरम्यान, नाशिक शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्यामुळे येथे रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच, जर कोरोना आटोक्यात आला नाही तर नियम तीव्र करु, असा इशाराही अन्न आणि नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांनी दिला. यापुढे नागरिकांनी मास्क लावला नाही तर 1000 रुपये दंड आकारला जाईल. तसेच त्यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करण्याचा इशारा अ छगन भुजबळ यांनी दिला.

इतर बातम्या :

‘भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवा’

उत्तर प्रदेश : मुलीची छेड काढणाऱ्याविरोधात तक्रार करणे जीवावर बेतलं, हाथरसमध्ये पित्याची गोळ्या झाडून हत्या

Angarki Sankashti Chaturthi 2021 : आज अंगारकी संकष्टी चतुर्थीला करा गणेशाची पूजा, वाचा शुभ मुहूर्त

(school in Nashik city will be closed upto 15 March due to Corona pandemic)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.