‘मेरा बाप चोर है’…’दिवार’मध्ये अमिताभच्या हातावर जसं गोंदलं होतं तसं…; संजय राऊत यांचा घणाघात कुणावर?

शिवसेना डॅमेज झालीय. शिवसेना फूट पडली असं वाटतं, तसं काही झालं नाही. एखाद दुसरा आमदार गेला म्हणजे पक्ष गेला असं होत नाही. पक्ष जमिनीवर आहे.

'मेरा बाप चोर है'...'दिवार'मध्ये अमिताभच्या हातावर जसं गोंदलं होतं तसं...; संजय राऊत यांचा घणाघात कुणावर?
'मेरा बाप चोर है'...'दिवार'मध्ये अमिताभच्या हातावर जसं गोंदलं होतं तसं...; संजय राऊत यांचा घणाघात कुणावर?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 1:48 PM

नाशिक: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यातील सरकार हे खोके सरकार आहे. शिवसेनेतून फुटलेले हे गद्दार आहेत. त्यांच्या माथी गद्दारीचा कलंक कायम राहील, असं सांगतानाच दिवारमध्ये अमिताभच्या हातावर लिहिलं होतं मेरा बाप चोर है, तसा गद्दारीचा शिक्का फुटलेल्या आमदारांच्या कपाळावर कायमचा बसला आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने आज पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला.

मी गद्दार किंवा खोकेवाल्यासांठी पत्रकार परिषद घेतली नाही. यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. जसं दिवार सिनेमात अमिताभच्या हातावर होतं, मेरा बाप चोर है. अमिताभच्या हातावर गोंदलं होतं, मेरा बाप चोर है, तसं यांचे नातेवाईक, यांचे पोरं यांच्या बायका यांना उद्या लोकं म्हणती हे गद्दारांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. यांच्या पिढ्या न पिढ्यांना ही गद्दारी शांतपणे बसू देणार नाही, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

हे सुद्धा वाचा

खोके म्हणजे खोकेच. गद्दारच आहेत ते. लोकं म्हणताहेत त्यांना खोकेवाले. बच्चू कडूंनीही लोक काय म्हणतात ते सांगितलं. काल वैजापूरच्या फुटलेल्या आमदाराला लोकांनी केवळ चपला मारायचं ठेवलं होतं. त्यांना गावातून काढलं होतं. जे शिवसेनेतून फुटलेले आहेत. त्यांचं भविष्य चांगलं दिसत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

आमची सुरक्षा काढली. आम्हाला कोणी हात लावतंय का? आम्ही एकटं फिरतोय मर्दासारखं. आम्ही म्हणतो का सुरक्षा द्या म्हणून? सुरक्षेशिवाय फिरण्याची हिंमत दाखवा. तुम्ही सुरक्षेत फिरताय याचा अर्थ तुम्हाला भीती आहे. जनता खवळलेली आहे, असं ते म्हणाले.

शिवसेना डॅमेज झालीय. शिवसेना फूट पडली असं वाटतं, तसं काही झालं नाही. एखाद दुसरा आमदार गेला म्हणजे पक्ष गेला असं होत नाही. पक्ष जमिनीवर आहे. सर्व पदाधिकारी मला भेटून गेले. पक्षात सर्वजण काम करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात निवडणुका का टाळता हे कळत नाही. महापालिका निवडणुकाही घेत नाही. भीतीपोटीच निवडणुका टाळत आहेत. कधीही निवडणुका घ्या शिवसेना पहिल्या पेक्षा जोमानं, नवीन चिन्हावर… मशाल असेल तर मशाल… बरं का आम्हाला चिंता नाही. नव्या चिन्हावरही शिवसेना विजयी होईल. लोकांमध्ये चीड आहे. ती उफाळून बाहेर येईल. शिवसेनेला कुठेही तडा गेला नाही, असा दावा त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.