त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्याने घंटा फेकून मारली, पोलिसात तक्रार

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मंदिरातील पूजक व पुजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली असून, एका पुजाऱ्याने (priest) दुसऱ्या पुजाऱ्याला चक्क घंटा फेकून मारली आहे. या प्रकरणी पोलिस (police) ठाण्यात  तक्रार दाखल करण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्याने घंटा फेकून मारली, पोलिसात तक्रार
संग्रहित.
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 3:26 PM

नाशिकः त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मंदिरातील पूजक व पुजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली असून, एका पुजाऱ्याने (priest) दुसऱ्या पुजाऱ्याला चक्क घंटा फेकून मारली आहे. या प्रकरणी पोलिस (police) ठाण्यात  तक्रार दाखल करण्यात आली आहे. (The priest of Trimbakeshwar threw the bell and lodged a complaint with the police)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यभर प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील पुजाऱ्यांमध्ये जुंपली आहे. सात सप्टेंबर रोजी मंदिराचे पूजक व पुजाऱ्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद थेट पोलिसांपर्यंत पोहचला . दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. यातील एक तक्रारदार पुजारी कैलास देशमुख यांचे असे म्हणणे आहे की, सात सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा सुरू होती. यावेळी यावेळी पूजक सत्यप्रिय शुक्ल यांनी पूजा साहित्य अस्वच्छ असल्याचे म्हणत शिवीगाळ केली. ते इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी घंटा फेकून मारली. भांडण वाढू नये म्हणून देशमुख मंदिराच्या बाहेर पडले. मात्र, शुक्ल यांनी पूजा सोडून त्यांचा पाठलाग केला. त्यांना मंदिराबाहेर येऊन शिवीगाळ केली. या प्रकरणी शुक्ल यांच्या म्हणण्यानुसार, कैलास देशमुख यांनी देवस्थान ट्रस्टच्या कोठडीत येत शिवीगाळ केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी विश्वस्त ललिता शिंदे ही उपस्थित होत्या. देशमुख यांनी पूजा सुरू असताना अडथळा आणला. धार्मिक परंपरा मोडीत काढल्याचाही आरोप केला आहे.

नाशिकमध्ये तरुणाचा गळा चिरला

एका अज्ञात युवकाचा मारेकऱ्यांनी गळा चिरल्याची घटना शुक्रवारी रात्री उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. जुना आडगाव नाक्यावरील राम रतन लॉज खाली ही घटना घडली. यामुळे पोलिस खातेही हादरून गेले असून, त्यांनी तातडीने मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. एका अज्ञात तरुणाचा मारेकऱ्यांनी पाठलाग सुरू केला. तेव्हा त्याने जीवाच्या आकांताने धावतपळत काट्या मारुती पोलिस चौकीजवळचा पेट्रोल पंप गाठला. तेथून पुढे असलेल्या संघवी मिलसमोर बेशुद्ध पडला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. मारेकऱ्यांनी तरुणाचा गळा चिरला होता. त्याच्या रक्ताचे डाग चक्क अर्ध्या किलोमीटरपर्यंत पडले होते. मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. मारेकऱ्यांचा शोधही सुरू करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. (The priest of Trimbakeshwar threw the bell and lodged a complaint with the police)

इतर बातम्याः 

नाशिकमध्ये सोने स्थिर, दहा ग्रॅमचे दर 47600 वर

नाशिक पालिकेला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, 7109 ऑक्सिजन बेड ठेवले सज्ज

हिरव्यागच्च झाडाचा बहर गळून पडला, सुलोचना महानोर यांचे निधन

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.