नाशिक: राज्यातील नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. तर येत्या 2 तारखेला मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यामुळे या पाचही निवडणुकीत काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अधिकच हायटेक ठरली आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपने अजूनही जाहीर पाठिंबा दिला नाही. तांबे हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील लढत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत तांबे गुलाल उधळणार की पाटील? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.