VIDEO : टोमॅटोनं पिकअप खच्चून भरला, चढावर पलटी होता-होता वाचला, व्हिडीओ पाहा

शेतकऱ्यासमोरची आव्हानं केवळ शेतात काबाड कष्ट करुन संपत नाही. हा माल शेतातून काढून कृषी बाजारापर्यंत नेण्याचंही मोठं काम शेतकऱ्याच्याच माथी असतं. मात्र ही माल वाहतूक करताना अनेकदा अपघातांनाही सामोरं जावं लागतं. नाशिकमधील सिन्नरमध्ये अशीच एक घटना पाहायला मिळाली.

VIDEO : टोमॅटोनं पिकअप खच्चून भरला, चढावर पलटी होता-होता वाचला, व्हिडीओ पाहा
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 12:13 PM

नाशिक : शेतकऱ्यासमोरची आव्हानं केवळ शेतात काबाड कष्ट करुन संपत नाही. हा माल शेतातून काढून कृषी बाजारापर्यंत नेण्याचंही मोठं काम शेतकऱ्याच्याच माथी असतं. मात्र ही माल वाहतूक करताना अनेकदा अपघातांनाही सामोरं जावं लागतं. नाशिकमधील सिन्नरमध्ये अशीच एक घटना पाहायला मिळाली. सिन्नरच्या डुबेरवाडी येथे टोमॅटो घेऊन जाणारा पिकअप पलटी होता-होता वाचला. या अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत.

सिन्नर तालुक्यातील डुबेरेवाडी येथे एक शेतकरी शेतातून टोमॅटोचे कॅरेट भरुन नेत होता. पिकअप हे कॅरेट घेऊन गावातून महामार्गावर येत असतानाच रस्त्यावरील चढाला पिकअपचे पुढील दोन्ही चाकं वरती झाले. त्यामुळे ही पिकअप पलटी होते की काय अशी स्थिती तयार झाली. मात्र, वाहनचालकाने प्रसंगावधान राखत गाडी बंद केली. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडी पलटी होण्यापासून रोखलं आणि चालकालाही सुखरुप गाडी बाहेर काढून वाचवलं.

व्हिडीओ पाहा :

किमान खर्च निघण्याच्या आशेवर शेतकऱ्याचे काबाड कष्ट, समोर अपघातांचंही संकट

पिकअप टोमॅटोच्या वजनाने ओव्हरलोड झाल्यानं असं घडल्याचं सांगण्यात आलंय. आधीच टोमॅटोचे दर कोसळले आहेत. त्यातच किमान शेतात कष्ट करुन पिकवलेले टोमॅटो बाजारात नेऊन खर्च तरी निघेल या आशेने शेतकरी टोमॅटो बाजारात नेत आहेत. मात्र, त्यातच अशा घटनांनी शेतकऱ्याच्या अडचणींमध्ये वाढच होतेय.

हेही वाचा :

राजकारण थांबवून शेतकऱ्यांना दिलासा द्या, अन्यथा सत्ताधारी-विरोधकांच्या दारात टॉमेटो ओतणार : किसान सभा

टोमॅटो उत्पादकांच्या अडचणी वाढल्या, दर पडले, खर्चही निघेना, नाशिक ते औरंगाबाद शेतकऱ्यांचा संताप

कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात टोमॅटोचा लाल चिखल, किलोला एक ते दीड रुपया दर, शेतकऱ्यांची परवड सुरुच

व्हिडीओ पाहा :

Tomato Pick up accident in Sinnar Nashik

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.