AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायतीच्या निर्णयानं महाराष्ट्र अवाक, उर्धुळच्या ग्रामपंचायतीचा मजुरांविरोधात ठराव, वाचा नेमकं काय घडलंय?

नाशिक जिल्ह्याच्या उर्धुळ ग्रामपंचायतीने एक अजब ठराव मंजूर केला आहे. ग्रामपंच्यातीच्या या ठरावाची प्रत सध्या महाराष्ट्रभर फिरत असून या निर्णयामुळे लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

ग्रामपंचायतीच्या निर्णयानं महाराष्ट्र अवाक, उर्धुळच्या ग्रामपंचायतीचा मजुरांविरोधात ठराव, वाचा नेमकं काय घडलंय?
URDHUL GRAM PANCHAYAT
| Edited By: | Updated on: Sep 20, 2021 | 9:11 PM
Share

नाशिक : देशात मजूर तसेच असंघटित कामगारांच्या हक्काचे रक्षण व्हावे यासाठी कठोर नियम आहेत. मजुरांची कुठेही कुचंबना होऊ नये याची सरकारकडून जमेल तशी काळजी घेतली जाते. मात्र, नाशिक जिल्ह्याच्या उर्धुळ ग्रामपंचायतीने एक अजब ठराव मंजूर केला आहे. ग्रामपंच्यातीच्या या ठरावाची प्रत सध्या महाराष्ट्रभर फिरत असून या निर्णयामुळे लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (urdhul gram panchayat nashik district pass resolution against labours people giving different reactions)

मजुराला दिवसाची रोजंदारी फक्त 200 रुपये

उर्धुळ ग्रामपंचयातीने गावातील तसेच गावाच्या बाहेर असणाऱ्या मजुरांविरोधात ठराव केला आहे. ठराव करुन ग्रामपंचायतीमार्फत रितसर आदेश जारी करण्यात आलाय. विशेष म्हणजे या नियमांची कोणी पायमल्ली केली तर त्याला गावातील देवळासमोर उभं करु दंड वसूल केला जाईल असा दम ग्रामपंचायतीने भरला आहे. ग्रामपंच्यातीच्या ठरावामध्ये मजुराला दिवसाची रोजंदारी फक्त 200 रुपये देण्यात आली आहे. आज गॅस सिलिंडर, पेट्रोल डिझेल तसेच फळभाज्यांचे भाव वधारलेले आहेत. असे असताना मजुरांना फक्त दोनशे रुपयांवर काम करण्याची उर्धुळ ग्रामपंचायतीची सक्ती सध्या चर्चेचा विषय़ ठरली आहे.

ग्रामपंचायतीने कोणता ठराव मंजूर केला ?

उर्धुळ ग्रामपंचायतीने जारी केलेल्या आदेशात गावातील सरपंच तसेच उपसरपंचांची नावे आहेत. 18 सप्टेंबर रोजी हा ठराव मंजूर करण्यात आलाय. ग्रामपंच्यातीने गावातील तसेच गावाबाहेरच्या शेतमजुरांना उद्देशून हा ठराव केला आहे. ठारावमध्ये खालील गोष्टी आहेत.

1) कांदा लागण- 7500 एकरी

2) कोणत्याही कामाचे मोजमाप करताना टेपचा वापर करावा

3) सोयाबीन व मका सोंगणी- 4 हजार एकरी

4) टोमॅटो तोडणी प्रत्येकी 15 रुपये कॅरेट

5) रोजंदारी दिवसाला 200 रुपये

6) वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत असेल.

देवळाच्या समोर बोलवून शिक्षा, 2100 रुपयांचा दंड 

तसेच वरिल नियमांचे गावातील शेतकरी तसेच मजुरांनी उल्लंघन केल्यास त्यांना गावातील देवळाच्या समोर बोलावले जाईल. तसेच सर्व ग्रामस्थांच्या समोर 2100 रुपयांचा दंड आकारला जाईल, असेदेखील या ठरावात सांगण्यात आले आहे.

ग्रामपंचायत म्हणते विकास हेच आमचे ध्येय

दरम्यान, उर्धुळ या ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या या ठरावाची सगळीकडे चर्चा होत आहे. विचारवंतांपासून ते शेतकरी तसेच मजूर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. विशेष म्हणजे उर्धुळ ग्रामपंचायत नागरिकांना कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन करत आहे. तसेच झाडे लावून पर्यावरण समृद्ध करा, स्वच्छतेतून समृद्धीकडे असे म्हणत विकास हेच आमचे ध्येय आहे, असे ब्रिद ग्रामपंचायत लावत आहे. एवढे आदर्शवादी विचार असूनही उर्धुळ ग्रामपंचायतीने मजुरांच्या बाबतीत असा ठराव मंजूर केल्यामुले महाराष्ट्र अवाक् झालाय.

इतर बातम्या :

केंद्र सरकारचा दिलासा : दाळीचे दर राहणार मर्यादीत, सणाच्या तोंडावर मोठा निर्णय

मध केंद्रासाठी 50 टक्के अनुदान, खादी व ग्राम उद्योग केंद्राकडून अनुदनासह मिळणार प्रशिक्षण

तरारून आलेलं पांढरं सोनं डोळ्यादेखत वाहून गेलं, कर्जाच्या चिंतेनं आणखी एका शेतकऱ्याचा बळी, शिदोळ गाव सुन्न

(urdhul gram panchayat nashik district pass resolution against labours people giving different reactions)

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.